23 April 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा
x

Hikal Share Price | हिकल लिमिटेड शेअरच्या गुंतवणूकदारांना मजबूत डिव्हीडंड मिळणार, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या

Highlights:

  • Hikal Share Price
  • शेअरची सध्याची किंमत
  • कंपनीच्या नफ्यात तब्बल 73.75 टक्के वाढ
  • शेअरची 52 आठवड्यांची पातळी
Hikal Share Price

Hikal Share Price | तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी हिकल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिकल कंपनीचे शेअर्स 296.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शेअरची सध्याची किंमत

अवघ्या काही तासात हिकल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 319.50 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के घसरणीसह 302.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मार्च तिमाही हिकल लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात 73 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या स्मॉल कॅप फार्मा कंपनीने मार्च तिमाहीत 36.07 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हिकल लिमिटेड कंपनीने 20.76 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

कंपनीच्या नफ्यात तब्बल 73.75 टक्के वाढ

म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात तब्बल 73.75 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत हिकल लिमिटेड कंपनीने 545.29 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मार्च तिमाहीच्या निकालासोबत हिकल लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश देखील वाटप केला होता. हिकल लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 0.60 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर 30 टक्के लाभांश देणार आहे.

शेअरची 52 आठवड्यांची पातळी

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 8.55 टक्के घसरणी आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 427.80 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 212 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,866.10 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hikal Share Price today on 31 May 2023

हॅशटॅग्स

#Hikal Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x