 
						Money In Emergency | अनेकवेळा आपल्याला अचानक पैशांची गरज लागते आणि आपण इतरांकडून कर्ज किंवा पैसे मागू लागतो. पण बऱ्याच वेळा आपल्याला पैसे मिळत नाहीत. अशा परिस्थितीत तुमच्याकडे कुठून तरी कर्ज घेणे किंवा उसने घेणे हाच पर्याय उरतो. बँकेकडून जेव्हा आपण कर्ज मागायला जातो, तेव्हा मौल्यवान वस्तू गहाण ठेवावे लागते. अशा परिस्थितीत, अनेक पर्याय आहेत ज्यातून तुम्ही कर्ज कधी शकता. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशाच 5 सोप्या पर्यायांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यातून तुम्ही अगदी सहज कर्ज काढू शकता.
एफडीवरही कर्ज :
पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर तुमची FD तोडण्याचा विचार करत असाल तर,थांबा. तुम्ही FD न तोडता ही तुमच्या FD वर सहज कर्ज घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या एफडी मूल्याच्या 90 टक्के पर्यंत कर्ज सहज मिळू शकते. या कर्जावरील व्याज जास्त असू शकते. असे कर्ज घेतल्याने तुमची पैशाची गरज पूर्ण होईल आणि तुमची FD देखील सुरक्षित राहील.
सोने गहाण ठेवल्यावरही कर्ज मिळते :
तुम्ही तुमच्या घरात ठेवलेल्या सोन्यावर बँकेकडून सहज कर्ज काढू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, तुम्हाला तुमच्या सोन्याच्या किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज काढता येते. हे कर्ज परत फेडीचे कालावधी 12 महिन्यांपर्यंत असू शकते. ते दीर्घ कालावधीसाठी देखील घेतले जाऊ शकते. या प्रकारच्या कर्जावर तुम्हाला 12 टक्के तर 17 टक्के व्याज द्यावा लागेल.
विमा पॉलिसीवर कर्ज :
तुम्ही तुमच्या विमा पॉलिसीवरही कर्ज काढू शकता. तुम्ही विमा पॉलिसीवर 85 टक्के ते 90 टक्के सहज कर्ज मिळवू शकता. या प्रकारच्या कर्जावर 9 ते 10 टक्के व्याज आकारला जातो.
शेअर्स गुंतवणुकीवर कर्ज :
जर तुम्ही तुमचे पैसे शेअर्समध्ये गुंतवले असतील, तर गरज पडल्यास तुम्ही लगेच शेअर्सची विक्री करू शकत नाही, पण त्यावर तुम्ही कर्ज घेऊ शकता. तुम्ही तुमच्या शेअर्सच्या 50 टक्के मुल्याऐवढे कर्ज मिळवू शकता. या कर्जावर तुम्हाला 11 टक्के ते 22 टक्के पर्यंत व्याज द्यावे लागेल. कर्ज परत फेडीचा कालावधी बँकेद्वारे निश्चित केला जाईल.
निवासी मालमत्तेवर कर्ज :
जर तुम्हाला पैशाची अचानक गरज असेल तर तुमचे घर तुम्हाला कर्ज मिळवून देऊ शकते. तुम्हाला तुमच्या घराच्या बाजार भावाच्या 60 ते 70 टक्के कर्ज सहज मिळू शकते. कर्ज परत फेडीचा कालावधी 2 वर्ष ते 20 वर्ष असू शकतो. अश्या प्रकारच्या कर्जावर तुम्हाला 11 टक्के ते 15 टक्के व्याज आकारला जाईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		