8 September 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा HDFC Mutual Fund | पालकांनो! तुमच्या मुलांसाठी खास योजना, महिना रु.5000 बचतीवर 1.37 कोटी परतावा मिळेल Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News My EPF Money | नोकरदारांनो खुशखबर आली! EPF खात्यात जमा होणार 2.35 कोटी रूपये; फायद्याची अपडेट - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो! डोळे झाकुन या SBI फंडात बचत करा, दर वर्षी 77% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News Post Office Insurance | सामान्य लोकांसाठी पोस्ट ऑफिसची ढासू स्कीम; 10 लाखांचा विमा फक्त 555 रुपयांत - Marathi News
x

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स खरेदी करावे? तज्ज्ञांनी येस बँक शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या बँकेचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 57,431 कोटी रुपये आहे. येस बँकेला जेसी फ्लॉवर्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शनकडून 120 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

येस बँकेचे शेअर्स सध्या 16-25 रुपये दरम्यान ट्रेड करत आहेत. मात्र 20 रुपयेच्या वर जाताच येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 3.12 टक्के घसरणीसह 20.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांच्या मते येस बँक स्टॉक 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसच्या एसएमएसह मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते येस बँक स्टॉक पुढील काळात 25 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. जर हा स्टॉक 25 रुपये किंमत पार करण्यात यशस्वी झाला तर, शेअरची किंमत 40 रुपयांच्या पुढे जाऊ शकते, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

येस बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत 30 बेस पॉइंट्स घसरणीसह 2.3 टक्केवर आले आहे. तिमाही आधारावर येस बँकेच्या निव्वळ व्याज मार्जीनमध्ये 20 बेसिस पॉइंट्सची घसरण पाहायला मिळाली आहे.

30 सप्टेंबर 2023 पर्यंत येस बँकेचा ग्रॉस NPA 2 टक्के नोंदवला गेला होता. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेचा ग्रॉस NPA 12.9 टक्के नोंदवला गेला होता. मागील वर्षी सप्टेंबर 2022 तिमाहीत बँकेचा नेट NPA 3.6 टक्के होता, जो या तिमाहीत 1 टक्केवर आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE 20 November 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(173)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x