20 May 2024 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
x

Newgen Share Price | फुकट शेअर्स मिळतील! न्यूजेन सॉफ्टवेअर फ्री बोनस शेअर्सची घोषणा करणार, योग्य वेळी एंट्री घ्या

Newgen Share Price

Newgen Share Price | न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा विचार करत आहे. पुढील काही दिवसांत आयोजित करण्यात येणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्स वाटप करण्याबाबत प्रस्ताव मंजूर केला जाईल. बोनस शेअर्सची बातमी आल्यानंतर न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 1,312.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालकाच्या बैठक 27 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करु शकतात.

मागील सहा महिन्यांत न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 1242.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 6 महिन्यांत न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 102 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 269 टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहेत.

ही कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रथमच बोनस शेअर्स वाटप करणार आहे. पूर्वी या कंपनीने गुंतवणूकदारांना कधीच बोनस शेअर्स वाटप केले नव्हते. मात्र ही कंपनी नियमित अंतराने गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Newgen Share Price 20 November 2023.

हॅशटॅग्स

Newgen Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x