6 May 2024 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

चंद्राबाबूंनी स्वतःच्या सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला: नरेंद्र मोदी

अमरावती: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदींनी देशभर सभांचा सपाटा लावला आहे. त्यानिमित्त आंध्र प्रदेशमध्ये मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, मोदींनी यावेळी चंद्राबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सध्या भारतीय जनता पक्षाने दक्षिणेकडील राज्यांकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.

यावेळी सभेतील भाषणावेळी चंद्राबाबूंना लक्ष करताना मोदी म्हणाले, चंद्राबाबूंनी सासऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते उद्या दिल्लीत फोटो काढण्यासाठी जात आहेत. परंतु भारतीय जनता पक्ष स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या पैशानं कार्यक्रम करते, तर हे आंध्र प्रदेशच्या सामान्य जनतेच्या तिजोरीतून पैसे काढून कार्यक्रम करत आहेत, अस सुद्धा नरेंद्र मोदी टीका करताना म्हणाले. ते गुंटूरमधल्या जनसभेला संबोधित करताना बोलत होते.

२०१४ मध्ये केंद्रात आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज दिलं. २०१६ मध्ये ते पॅकेज लागू देखील करण्यात आलं. त्यामुळे आंध्र प्रदेशला विशेष राज्या सारखीच त्यावेळी मदत मिळाली. दरम्यान, आंध्राच्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्ट स्वीकारून केंद्राचे आभार मानले होते. परंतु केंद्रानं दिलेल्या पॅकेजचा चंद्राबाबू सरकारने योग्य वापर केला नाही. अखेर राज्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेल्या टीडीपीनं पलटी घेतली, असा थेट हल्लाबोल मोदींनी केला आहे.

हॅशटॅग्स

#Chandra Babu Naidu(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x