3 May 2024 8:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कोरोना आपत्तीत स्वतःचा जीव स्वतःच वाचवा | पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत

India, Covid19, Corona Virus, Rahul gandhi, PM Modi, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १४ सप्टेंबर : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.

देशातील करोनाच्या वाढत्या प्रसारावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून, मोदींना लक्ष्य केलं आहे. “करोनाची रुग्णसंख्या या आठवड्यात ५० लाख आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १० लाखांच्या पुढे जाईल. अनियोजित लॉकडाउन एका व्यक्तीच्या अंहकाराची देण आहे, ज्यामुळे करोना देशभर पसरला. मोदी सरकारनं आत्मनिर्भर व्हा असं सांगितलं आहे. म्हणजेच स्वतःचा जीव स्वतःच वाचवा, कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.

दरम्यान, सलग पाचव्या दिवशी आज 90 हजारहून नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 48 लाख पार झाली आहे. गेल्या 24 तासांत 92 हजार 071 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. गेल्या पाच दिवसातील हा कमी आकडा आहे. तर, एकाच दिवसात 1136 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृतांचा आकडा 79 हजार 722 झाला आहे. आतापर्यंत 37 लाख 80 हजार 108 लोक निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 9 लाख 86 हजार 598 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

News English Summary: The number of coronary heart disease patients is increasing rapidly across the country. There is an atmosphere of concern as the number of corona is increasing. Congress leader Rahul Gandhi has lashed out at Prime Minister Narendra Modi over the growing number of corona patients.

News English Title: Congress MP Rahul Gandhi criticized PM Narendra Modi Coronavirus In India Lockdown Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x