16 May 2024 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेतील फक्त 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर 35 लाखांचा परतावा मिळेल, योजनेचा लाभ घेतला का?

Post Office scheme

Post Office Scheme | आपल्याला सर्वांना गुंतवणूक करताना सुरक्षित योजना आणि हमखास परतावा हवा असतो. आपण गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय शोधत असतो. मुदत ठेव योजना, भविष्य निर्वाह निधी अश्या अनेक गुंतवणूक योजना बाजारात उपलब्ध आहेत. शेअर बाजाराचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे किंवा जोखीम असल्यामुळे आपण स्टॉक मध्ये गुंतवणूक न करता, सरकारी योजना मध्ये गुंतवणूक करतो, कारण ते सुरक्षित असतात, आणि हमखास परतावा देतात. अश्याच काही गुंतवणूक योजना पोस्ट ऑफिस तर्फेदेखील राबवल्या जातात. चला तर मग जाणून घेऊ पोस्ट ऑफिस च्या गुंतवणूक योजनाबद्दल.

ग्राम सुरक्षा योजना :
आर्थिक फसवणुक टाळण्यासाठी लोक कोणत्याही नवीन योजनेत गुंतवणूक करण्यास घाबरतात. परंतु असेही काही लोक असतात ज्यांना गुंतवणूक करायची असते पण त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी हवी तेवढी रक्कम उपलब्ध नसते. या लेखात आपण अश्या लोकांना पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक योजनेबद्दल सविस्तर माहिती देतो. दोन लोकांच्या समस्या दूर करतो. पोस्ट ऑफिस च्या अश्या काही योजना आहेत, ज्यामध्‍ये गुंतवणूक करणे खूप सुरक्षित तर आहेच, सोबत हमखास परतावा देखील मिळतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फक्त प्रतिदिन 50 रुपये जमा करावे लागेल. इंडिया पोस्ट म्हणजेच आपले भारतीय डाक खाते अनेकदा विविध प्रकारच्या लहान गुंतवणूक योजना राबवत असते. या सरकारी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही भरघोस परतावा कमवू शकता. आपण ज्या पोस्ट ऑफिस च्या गुंतवणूक योजनेबद्दल चर्चा करत आहोत, त्या योजनेचे नाव आहे “ग्राम सुरक्षा योजना”. या अंतर्गत तुम्ही फक्त 50 रुपये गुंतवून दीर्घकाळात 35 लाख रुपयेचा परतावा मिळवू शकता.

इंडिया पोस्टद्वारे संचालित :
इंडिया पोस्टच्या या सरकारी गुंतवणूक योजनेत पैसे जमा करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. या छोट्या गुंतवणुकीत दीर्घ काळ गुंतवणूक करत राहिल्यास तुम्हाला मोठा व्याजासकट भरघोस परतावा मिळू शकतो. या गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून तुमची बचत ही सुरू होईल. सरकारने भारतीय पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमांतर्गत ही अद्भुत योजना सुरू केली होती. समजा योजना चालू असताना गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला,तर चिंतेचे काही कारण नाही. योजनेतील गुंतवणुकीचे पैसे त्याच्या नॉमिनी सदस्याला दिले जातील.

गुंतवणुकीच्या अटी आणि नियम :
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 19 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे असावे. या वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस च्या या गुंतवणूक योजनेत किमान 10 हजार रुपयांपासून ते कमाल 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. तुमच्या सोयीनुसार, तुम्ही “ग्राम सुरक्षा योजनेत” गुंतवणुकीचा हप्ता मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने जमा करू शकता. समजा तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षापासून या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली असेल तर 55 वर्षांपर्यंत तुम्हाला मासिक 1515 रुपये प्रीमियम भरावा लागेल, जेणेकरून तुम्हाला मॅच्युरिटीवर 31.60 लाख रुपये परतावा मिळू शकेल. दुसरीकडे, 60 वर्ष वयापर्यंत मासिक प्रीमियममध्ये तुम्हाला 1411 रुपये जमा करावे लागेल, तर तुम्हाला 34.60 लाख रुपये परतावा मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office scheme Gram Suraksha Yojana investment opportunity for long term on 14 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x