12 December 2024 8:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Viral Video | सेल्फी वेडा माणूस, समुद्रात पकडलेल्या माशा'सोबत सेल्फी काढला, नंतर मासा सोडून मोबाईल पाण्यात फेकला, पहा व्हिडिओ

Viral Video

Viral Video | इंटरनेटवर युजर्सना सरप्राईज देणाऱ्या व्हिडीओजची कमतरता नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहा… पैज लावून सांगतो की आपण त्यावर हसणे थांबवू शकणार नाही. तुम्ही जर या व्यक्तीच्या जागी असता तर असा गोंधळ घातल्यानंतर तुम्ही नक्कीच डोकं धरून बसला असता. चूक झाली तर ती सेल्फीमुळे. या सेल्फीची क्रेझ तुम्हाला माहितीये. या व्यक्तीने बोटीत उभे राहून माशासोबत सेल्फी काढले. अनेक सेल्फी काढले पण शेवटी असे काही केले की डोक्याला हात लावाल.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, हा माणूस बोटीत मस्ती करत उभा आहे, त्याच्या एका हातात फोन आहे तर दुसऱ्या हातात मासा आहे. खरं तर मासे पकडल्यानंतर तो इतका खूश असतो की, त्याच्यासोबत सेल्फी काढायला सुरुवात करतो, पण तो माशांसोबत सेल्फी काढण्यात इतका हरवून जातो की फोटो काढून झाल्यावर पाण्यात मासे फेकायचा वेळ आला की तो माशाऐवजी आपला मोबाईल फेकतो. आपण माशाऐवजी फोन फेकला आहे हे लक्षात येताच तो निराश होतो आणि पश्चात्ताप करू लागतो आणि फोनकडे बघण्यासाठी पुढे झुकतो.

हा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर तन्सू येगन नावाच्या अकाऊंटसोबत शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 12.5 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि 150,000 लोकांनी त्याला लाईक केले आहे. यावर युझर्स खूप मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

पहा व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of man throws mobile phone in water after taking selfie with fish check details 14 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x