18 May 2024 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

VIDEO | वृत्त वाहिनीवर हिंदू-मुस्लिम अजेंडा चालवा, मोदी-योगी-भाजप विरोधात न बोलण्याचे संपादकाचे आदेश - पत्रकाराने वास्तव मांडलं

Journalist Anil Yadav

Journalist Anil Yadav | लखनऊमध्ये न्यूज नेशनचे माजी पत्रकार अनिल यादव यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. न्यूज नेशन या वृत्तवाहिनीने पत्रकारांसाठी भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा अन्य कोणत्याही भाजप नेत्याविरोधात कोणत्याही प्रकारचे टीकात्मक शब्द वापरू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत, असे ते या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

पत्रकार अनिल यादव यांनी न्यूज नेशनमधून राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून प्रसार माध्यमांचं वास्तव अधोरेखित केलं आहे. या व्हिडिओमध्ये पत्रकार अनिल यादव म्हणतात, “गेल्या पाच वर्षांपासून परिस्थिती अतिशय भयावह आहे. मला स्वतःला पत्रकार म्हणवून घेताना लाज वाटते. मी नोकर आहे. हिंदू-मुस्लिम द्वेष वाढेल असे जास्तीत जास्त कंटेंट वाहिनीवर चालवा असं सांगतीलं जातंय असा खुलासा देखील त्यांनी केला आहे.

जर तुम्हाला एखाद्या नेत्यावर किंवा त्यांच्या धोरणावर टीका करायची असेल तर ती राहुल गांधी, प्रियांका गांधी, मायावती आणि अखिलेश यादव आहेत,” ते पुढे म्हणतात. न्यूज नेशन वहिनीला उत्तर प्रदेश सरकारकडून वर्षाकाठी १७-१८ कोटी रुपयांचा महसूल मिळतो, असा दावा यादव यांनी केला आहे. त्यामुळेच न्यूज नेशन तसेच त्याची प्रादेशिक वाहिनी त्यांच्याविरोधात काहीही बोलू शकत नाही. “तुम्ही असं केलंत तर आम्हाला मेल येईल किंवा आमच्या नोकऱ्या धोक्यात येतील,” असं ते म्हणतात.

सर्वत्र हिंदू-मुस्लिम अजेंडा चालवण्याचे आदेश :
न्यूज नेशनने चॅनेलवर सर्वत्र जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम अजेंडा चालवल्याचा आरोप यादव यांनी केला. ‘सरकारमध्ये घोटाळा झाला आहे किंवा एखाद्या मंत्र्याने काही सांगितले आहे, असे म्हटले तर आम्हाला याबाबत काहीही करू नये, अशा लगेच सूचना दिल्या जातात.

मीडिया रिपोर्टनुसार, अनिल यादव यांनी आपल्या राजीनामा पत्रात आरोप केला आहे की, न्यूज नेशनच्या पत्रकारांवर मुस्लिमांशी संबंधित बातम्या आणण्यासाठी दबाव आणला जात आहे. मुस्लिमांशी संबंधित वाद शोधून काढणे, मुस्लिमांना भडकावणे, वादग्रस्त विधाने करण्यास सांगणे यासाठी त्यांच्यावर दबाव आहे. ते पुढे म्हणाले की, चॅनेलच्या पत्रकारांना बोलण्याचे किंवा लिहिण्याचे स्वातंत्र्य नाही. सोशल मीडियावरही व्यक्त होऊ नका असे देखील आदेश दिले जातात असं त्यांनी सांगताना प्रसार माध्यमांवरील वास्तव मांडलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Journalist Anil Yadav resigned from News Nation check details 14 September 2022.

हॅशटॅग्स

#Journalist Anil Yadav(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x