18 May 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला
x

येथेही वेंदाताप्रमाणे गेम? | नामिबियाच्या अभ्यास पथकाने आफ्रिकन चित्त्यांच्या वास्तव्यासाठी राजस्थान'मधील व्याघ्र प्रकल्प सुचवलेला

Cheeta

Cheeta In India | नामिबियाच्या अभ्यास पथकाला भारतातील राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प आफ्रिकन चित्त्यांच्या वास्तव्यासाठी योग्य वाटत असूनही आणि राज्य सरकारने (राजस्थान) या संदर्भात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवूनही मुकुंद्रा व्याघ्र प्रकल्पमध्ये चित्त्यांना वास्तव्यास न सोडता भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशाची निवड करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प भौगोलिक दृष्ट्या योग्य असल्याचं मत अभ्यासाअंती नामिबियाच्या अभ्यास पथकाने केंद्राला दिलं होतं. मात्र येथेही राजकारण विचारात धरण्यात आल्याने प्राणिमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

नामिबियाहून भारतात आलेल्या या अभ्यास पथकाला कोटा जिल्ह्यातील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पातील दारा अभयारण्य परिसर असलेले ८० चौरस किमीचे आवार हे भौगोलिक तुलनेत मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय अभयारण्याच्या उजवे असल्याचे दिसले होते. आफ्रिकन चित्त्यांच्या संचारासाठी ते योग्य वाटले होते. यानंतर राजस्थानमधील मुकुंद्रा येथील जंगलात नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्यांचा बंदोबस्त होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि त्यासाठी राजस्थान सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्तावही पाठवला होता, मात्र केंद्रातून ठोस भूमिका न घेताच चित्ते भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमध्ये मार्गस्त केली आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा इव्हेन्ट घडवून आणला अशी टीका सुरु झाली आहे.

कोटाची बाजू केंद्रात ठामपणे ठेवली गेली नाही :
नामिबियाच्या अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या या पथकाला कोटा जिल्ह्यातील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पातील दारा अभयारण्य क्षेत्रासह ८० चौरस किमीचा परिसर तसेच मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय अभयारण्याच्या तुलनेत अधिक पोषक वाटला होता. तसेच आफ्रिकन चित्त्यांसाठी जे वातावरण गरजेनुसार असते ते येथेच आहे असा अभ्यासाअंती निष्कर्ष काढला होता. मात्र त्यानंतरही केंद्राने असा निर्णय कसा घेतला याबद्दल वन्यजीव आणि पर्यावरण प्रेमींना प्रचंड चिंता व्यक्त केली आहे. देशातून नामशेष झालेल्या चित्त्यांना भारतात आणले हे उत्तम आहे, पण प्राण्यांमध्ये सुद्धा राजकारण कसं काय पाहिलं जाऊ शकतं असं वन्यजीव प्रेमींनी म्हटलं आहे.

राजस्थानच्या वन्यजीव विभागाने कोटाच्या मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पाबरोबरच बारन जिल्ह्यातील शेरगड अभयारण्यासह चित्ता यांच्या वस्तीसाठीही उल्लेख केला होता. काही महिन्यांपूर्वी भारतीय वन्यजीव संस्थेच्या (डब्ल्यूआयआय) एका गटाने शेरगड अभयारण्य परिसराला भेट दिली आणि चित्ता वस्तीसाठी ते योग्य वाटले. शेरगड अभयारण्य ९० चौरस किलोमीटरच्या परिघामध्ये पसरलेले आहे, त्यानंतर डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या पथकानेही शेरगड अभयारण्याचे क्षेत्र कमी असल्याचे प्राथमिक निरीक्षणानंतर स्पष्ट केले आणि नंतर सूत्र हलली असं म्हटलं जातंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

India News: Cheeta arrived in India check details 18 September 2022.

हॅशटॅग्स

#Cheeta(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x