
DB realty Share Price| भारतीय शेअर बाजारात गौतम अदानी यांनी एक वेगळीच छाप सोडली आहे. त्यांच्या जवळपास सर्व कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्या आहेत आणि ते आपल्या गुंतवणूकदारांना भरमसाठ परतावा ही मिळवून देत आहेत. एखाद्या कंपनीसोबत गौतम अदानी यांचे नाव जरी जुळले तर त्या कंपनीचे स्टॉक गगनाला जाऊन भिडतात. असाच काहीसा प्रकार एका रिअल इस्टेट कंपनीच्या बाबतीत घडला आहे.
अदानी इफेक्ट ऑन डी बी रियल्टि – DB realty Stock Price :
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अदानी समूहाचे सर्वेसर्वा “गौतम अदानी” यांचे नाव एका रियल इस्टेट कंपनीशी जुळताच त्याच्या शेअर्सची किंमत गगनाला जाऊन भिडली आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ह्या स्टॉकमध्ये 115 टक्के पेक्षा अधिक वाढ झाली आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत तो आहे, DB Realty कंपनीचा. मागील अनेक ट्रेडिंग सेशनपासून DB Realty कंपनीचा शेअर सातत्याने अप्पर सर्किटला स्पर्श करत आहे.
सध्या ट्रेडिंग किंमत :
DB Realty कंपनीचे शेअर्स सध्या 114.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये DB Realty कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 4.96 टक्के वाढीसह 114.20 रुपयेच्या अप्पर सर्किट ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकच्या किमतीत कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे, या काळात शेअरच्या किंमतीत 21.42 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 21 दिवसांचा चार्ट पॅटर्न पहिला तर आपल्याला असे दिसेल की DB Reality च्या शेअर्समध्ये 115.27 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. यादरम्यान, शेअरची किंमत 53 रुपयांवरून 114.20 रुपयांपर्यंत वाढली आहे.
गौतम अदानीशी DB Reality चा काय संबंध?
गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. शेअर बाजारात अशी बातमी आहे की, गौतम अदानी एक मोठी रिअल इस्टेट डील करणार असल्याचे समजते. गौतम अदानी यांची आलिशान निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता मुंबईस्थित कंपनी “अदानी रियल्टी” डीबी रियल्टीमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये बोलणी सुरू असल्याचे समजते. अदानी रियल्टीही मुंबईस्थित कंपनी डीबी रियल्टीशी विलिनिकरणाबाबत बोलणी करत आहे. जर हा विलीनीकरण करार झाला तर डीबी रियल्टीचे नाव बदलून “अदानी रियल्टी” असे करण्यात येईल. जर अदानी आणि DB Reality मध्ये हा करार झाला तर, ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी रियल्टी डील असू शकते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.