7 May 2024 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

ही म्युच्युअल फंड योजना वेगाने पैसा वाढवते आहे, या फंडाची योजना नोट करा आणि गुंतवणुकीचा विचार करा

Mutual fund, Aditya Birla Sun Life Frontline Equity Mutual Fund, SIP, investment, BSE, NSE, compund interest,

Mutual Funds | म्युचुअल फंड ही एक गुंतवणुकीची भरघोस परतावा देणारी योजना मानली जाते, परंतु तुम्हाला योग्य म्युचुअल फंड ओळखता आला पाहिजे. म्युचुअल फंडमध्ये दीर्घकाळासाठी SIP गुंतवणूक करून तुम्ही भरघोस परतावा कमवू शकता. आज आपण अश्याच एका म्युचुअल फंड योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. हा म्युचुअल फंड आहे आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचा ओघ आणि गुंतवणूकदारांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. आजकाल लोक म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू लागले आहेत, कारण त्यांना दीर्घकाळ गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळत आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी म्युच्युअल फंड :
जर तुम्हाला छोटी गुंतवणूक करून शाश्वत दुप्पट परतावा कमवायचा असेल, तर या लेखात आम्ही तुम्हाला जबरदस्त म्युच्युअल फंडबद्दल माहिती देणार आहोत. या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे पैसे अवघ्या तीन वर्षांत दुप्पट झाले आहेत. तुम्हालाही तुमचे पैसे अल्पावधीत दुप्पट करायचे असतील, तुम्ही आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी म्युच्युअल फंडाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली पाहिजे. ही योजना गुंतवणूकीसाठी एक जबरदस्त पर्याय उपलब्ध करून देत आहे. जर तुम्ही10 वर्षांपूर्वी या योजनेत फक्त 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती, तर सध्या तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर 24.06 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. जर 5 वर्षांपूर्वी तुम्ही या योजनेत10,000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर तुम्हाला सध्या तुमच्या गुंतवणुकीवर 8.61 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.

आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडात गुंतवणूक करणाऱ्याला फक्त 3 वर्षांत दुप्पट परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. ह्या म्युच्युअल फंडची सुरुवात 20 वर्षांपूर्वी आदित्य बिर्ला यांनी केली होती. मागील 20 वर्षांत, या म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 19.25 टक्के दर वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. दुसरीकडे, मागील तीन वर्षांचा परतावा पहिला तर असे दिसेल की, गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. जर तुम्ही या योजनेत फक्त 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक केली असती, तर तुम्हाला 20 वर्षांत 1.82 कोटी रुपये परतावा मिळाला असता.

तुम्ही 10 वर्ष दर महिन्याला 10,000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक करून 24.06 लाख रुपयांचा हमखास परतावा कमवू शकता. दुसरीकडे, आपण मागील 5 वर्षांचा परतावा पहिला तर, असे दिसेल की गुंतवणूकदारांनी 10,000 रुपयांच्या मासिक SIP गुंतवणुकीवर 8.61 लाख रुपयांचा परतावा कमावला आहे. या म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना दर वार्षिक 19.5 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, मागील दोन वर्षांत, या म्युचुअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी दर वार्षिक 24.66 टक्केचा भरघोस परतावा कमावला आहे.

योजनेबद्दल सविस्तर माहिती :
30 जून 2022 पर्यंत आदित्य बिर्ला सन लाइन फ्रंटलाइन इक्विटी फंडात सुमारे 21534.38 कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. त्याच वेळी 30 ऑगस्ट 2022 रोजी, या म्युचुअल फंडाची एनएव्ही म्हणजेच निव्वळ मालमत्ता मूल्य 338.76 रुपये नोंदवले गेले आहे. या म्युचुअल फंडाची मुख्यतः गुंतवणूक ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, आर्थिक, तंत्रज्ञान आणि ऑटोमोटिव्ह उद्योग क्षेत्रात आहे. यासोबतच या म्युचुअल फंडाच्या पाच सर्वाधिक मोठ्या गुंतवणूक इन्फोसिस लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि लार्सन अँड टुब्रो या कंपनीच्या शेअर्स मध्ये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund of Aditya Birla Sun Life Frontline Equity Mutual Fund check details 21 September 2022

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x