 
						Multibagger IPO | शेअर बाजारात नुकताच हर्षा इंजिनियरिंगचा IPO खुला करण्यात होता, आणि गुंतवणूकदारांकडून या IPO ला सुपर से उपर प्रतिसाद मिळाला आहे. ग्रे मार्केट मध्ये हर्षा इंजिनिअरिंग स्टॉक प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होता. आता गुंतवणूकदार हा स्टॉक बाजारात सूचीबद्ध होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हर्षा इंजिनियर्सचा स्टॉक 26 सप्टेंबर 2022 रोजी BSE-NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेअर बाजारात थोडीफार पडझड दिसून येत असली तरी, हर्षा इंजिनियर्सचा स्टॉक शानदार लिस्टिंग साठी सज्ज झाला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेडचे शेअर्स 185 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. काल ग्रे मार्केटमध्ये हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलचा शेअर प्रीमियममध्ये ट्रेड करत होता.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्विटी मार्केटने इंट्राडे नीचांकावरून जोरदार पुनरागमन केल्याचे दिसून आले होते. दलाल स्ट्रीटवरील नकारात्मक भावनामध्ये बदल झाल्यास, हर्षा इंजिनियर्सचा स्टॉक जबरदस्त लिस्टिंग प्राईस देऊ शकतो. मागील काही आठवड्यापासून शेअर बाजारात पुन्हा एकदा विक्रीचा दबाव दिसून आला आहे, आणि त्याचा परिणाम स्वरूप शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळाली आहे.
किती रुपयेला लिस्टिंग होईल स्टॉक :
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, स्टॉक मार्केटमध्ये कमजोरी असली तरी, ग्रे मार्केटमध्ये हर्षा इंजिनियर्सच्या IPO मध्ये जबरदस्त प्रीमियम लिस्टिंग होण्याचे संकेत दिसत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की हर्षा इंजिनियर्सचा IPO ग्रे मार्केटमध्ये 185 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ ग्रे मार्केटमध्ये स्टॉक सध्या 515 रुपयेवर व्यवहार करत आहे. हर्षा इंजिनियर्सच्या IPO ची प्राइस बँड प्रति शेअर 314 रुपये ते 330 रुपये च्या दरम्यान आहे. म्हणजेच, शेअर 56.टक्केच्या प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होईल.
IPO इश्यूमध्ये बंपर बोली :
IPO खुला झाल्यावर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या मोठ्या मागणीमुळे हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स 75 पट अधिक सबस्क्राईब झाले आहेत. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी कोटा राखीव ठेवण्यात आला होता, त्यापैकी हा कोटा 178.26 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 71.32 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. या 755 कोटीं रुपयेच्या IPO मध्ये 455 कोटीं रूपयेचे नवीन शेअर्स इश्यू करण्यात आले आहे आणि 300 कोटीं रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल मध्ये विकले जाणार आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		