28 April 2024 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

Viral Video | पिटबुल कुत्र्याचा गायीवर हल्ला, गायीचा जबडा सोडवण्यासाठी अनेकांचा प्रयत्न, पण पिटबुलची ताकद व्हायरल व्हिडिओत पहा

Pitbull Dog

Pitbull Dog | कुत्रा मांजर म्हणजे सर्वांच्या जवळचा विषय आहे. आजकाल प्रत्येक घरामध्ये कुत्रा आणि मांजर पहायला मिळते. प्रत्येक जण वेगवेगळ्या जातीचे कुत्रा मांजर पाळत असतात मात्र ते आपल्याला इजा करू नये याची तेवढीच काळजी घ्यायला हवी. दरम्यान, कुत्र्यांमध्ये एक प्रजात आहे जी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. तुम्ही पिटबुल कुत्र्याचे नाव तर एकलेच असेल, या कुत्र्याचा चावा किती घातक असू शकतो हे सर्वांनाच माहिती आहे. पिटबुलचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये पिटबुल कुत्र्याने गायीवर हल्ला केला आहे.

उत्तर प्रदेशातून व्हिडीओ झाला व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये एका पिटबुल कुत्र्याने गायीवर हल्ला केला आहे. हा व्हिडिओ कानपूरच्या सरसैया घाट भागातील सांगितला जात आहे, ज्यामध्ये पिटबुल गायीवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसून येते की, कुत्र्याने गायीचा जबडा आपल्या तोंडामध्ये अगदी घट्ट धरून ठेवला आहे. यावेळी गायीचा मालक त्या कुत्र्याला काठीने मारण्याचा प्रयत्न करतो मात्र तो कुत्रा त्या गायीला सोडण्याचे नावच घेईना. कुत्र्याला बेदम चोप दिल्या नंतर गाय पिटबुलच्या मजबूत जबड्यातून सुटू शकली.

पिटबुल कुत्र्याला पिंजऱ्यात ठेवले
या घटनेनंतर त्या कुत्र्याला पालिका अधिकाऱ्यांनी पिटबुलला पकडून पिंजऱ्यात टाकले आणि त्याचवेळी पिटबुलच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गायीला पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पिटबुलचे मालक गोल्डी मिश्रा यांना कुत्र्याचा परवाना दाखवण्यास सांगितले आहे तसेच पिटबुलने आठवडाभरापूर्वी याच परिसरातील आणखी एका व्यक्तीवर हल्ला केला होता. गेल्या दोन महिन्यांत पिटबुल हल्ल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत तसेच जुलैमध्ये लखनऊमध्ये पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pitbull Dog Attacks On Cow video trending on social media Checks details 24 September 2022.

हॅशटॅग्स

Pitbull Dog Attacks On Cow(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x