7 May 2025 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

Stocks To Buy | टॉप पाच स्टॉक खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, मालामाल होण्याची संधी सोडू नका, लिस्ट सेव्ह करा

stocks to Buy

Stocks To Buy | सध्या आपण पाहू शकतो, की शेअर बाजारात अक्षरशः हाहाकार माजला आहे. सध्याची शेअर बाजारातील परिस्थिती ही खूप अस्थिर आणि धोकादायक मानली जात आहे. शेअर बाजारात कधी कोणती बातमी येईल, आणि बाजारात किती कोसळेल सांगता येत नाही. अश्या पडझडीचे काळात अॅक्सिस सिक्युरिटीजने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बँकिंग क्षेत्रातील काही जबरदस्त स्टॉक निवडले आहेत. तज्ञांनी हे स्टॉक पडत्या किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने अशा पाच बँकिंग स्टॉकची निवड केली आहे ज्यातून गुंतवणूकदार पुढील काळात 28 टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा कमवू शकता. विशेष म्हणजे, शेअर बाजार तज्ज्ञ बँकिंग क्षेत्रात तेजी येण्याचा अंदाज वर्तवत आहेत. अशा परिस्थितीत बँकिंग शेअर्स गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. अॅक्सिस सिक्युरिटीजने सुचवलेले बँकिंग शेअर्स कोणते आहेत, जाणून घेऊ सविस्तर

स्टेट बँक ऑफ इंडिया/ SBI :
अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मने आपल्या गुंतवणूकदारांना हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ह्या स्टॉकची टार्गेट प्राईस 665 रुपये ठरवण्यात आली आहे. या शेअर सध्याची 550 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ ब्रोकरेज फर्मने ह्या स्टॉकमध्ये 21 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील 5 वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के परतावा कमवून दिला आहे.

Equitas Small Finance Bank :
Axis Securities फर्मने आपल्या गुंतवणूकदारांना हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉक मध्ये पुढील काळात 20 टक्के वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉक साठी 60 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. सध्याहा स्टॉक 49.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे.

HDFC बँक :
ब्रोकरेज फर्मने आपल्या गुंतवणूकदारांना हा स्टॉक 1840 रुपये या टार्गेट प्राईस साठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्या 1446 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की HDFC बँकचा स्टॉक पुढील काळात 28 टक्क्यांपर्यंत उसळी घेऊ शकतो. HDFC ने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 58 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे.

Kotak Mahindra Bank/ कोटक महिंद्रा बँक :
ब्रोकरेज फर्म ने आपल्या गुंतवणूकदारांना कोटक बँकेचा स्टॉक 2250 रुपयेच्या टार्गेट प्राईस साठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 21 टक्के परतावा देईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. हा स्टॉक सध्या 1862 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 5 वर्षांत कोटक बँक च्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 82 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

Bandhan Bank/ बंधन बँक :
अॅक्सिस सिक्युरिटीज फर्म ने आपल्या गुंतवणूकदारांना 350 रुपयांच्या टार्गेट प्राईससाठी बंधन बँकचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हा स्टॉक 278 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आणि पुढे येणाऱ्या काळात ह्या स्टॉकमध्ये 26 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. मागील पाच वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना निराश केले आहे,44 टक्केचा तोटा केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Top 5 banking stocks to Buy on recommendation of Axis Securities on 26 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)Banking stock(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या