 
						Stock in Focus | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून ब्रॉडकास्ट सॅटेलाइट सर्व्हिस प्रोव्हायडर Dish TV कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये आले आहेत. या कंपनीत व्यवस्थापन स्तरावर काही वाद झाले होते, त्यात आता वाढ होताना दिसून येत आहे. त्याचा विपरीत परिणाम शेअर्सच्या किमतीवर स्पष्टपणे दिसत आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून हा स्टॉक 14 टक्क्यांपेक्षा अधिक खाली घसरला आहे. तथापि काल स्टॉकमध्ये थोडी रिकव्हरी पाहायला मिळाली आणि स्टॉक 2 टक्के वाढून 16.40 रुपये किमतीवर बंद झाला होता.
Dish TV शेअरच्या किंमतीचा इतिहास :
मागील एका वर्षात डिश टीव्हीच्या शेअर्समध्ये 20.77 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. यादरम्यान स्टॉक 20.70 रुपयांवर ट्रेड करत होता, तो खाली पडून आता 16.40 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, मागील पाच वर्षांत ह्या स्टॉकमध्ये 78.09 टक्केपर्यंत पडझड झाली असून गुंतवणूकदारांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल आहे. या दरम्यान, हा शेअर 74.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, आणि त्यात कमालीची पडझड होऊन स्टॉक सध्याच्या सर्वकालीन किमतीपर्यंत घसरला आहे. 15 वर्षांपूर्वी स्टॉक 109.60 रुपयांवर ट्रेड करत होता, आणि त्यात वाढ तर राहू द्या, व्यवस्थापन वादामुळे इतकी पडझड झाली की सध्या स्टॉक 16.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. या कालावधीत Dish TV मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सुमारे 85.04 टक्के नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ज्या लोकांनी ह्या स्टॉकमध्ये 2007 साली गुंतवणूक केली होती, त्यांना सध्या भयानक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यावेळी ज्यांनी ज्या स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 15.03 हजार झाले आहे.
कंपनीतील वाद :
Dish TV चे अध्यक्ष जवाहरलाल गोयल यांनी कंपनीच्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदाराच्या विरोधानंतर कंपनीच्या संचालक पदाचा आणि संचालक मंडळाचा राजीनामा दिला. कंपनीच्या संचालकांना पायउतार व्हावे लागल्यानंतर कंपनीच्या AGM मध्ये. डिश टीव्हीच्या भागधारकांनी 2020 ते 2021 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी आर्थिक स्टेटमेन्ट स्वीकारून राकेश मोहन यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करणे नाकारले. यासोबत चार इतरही प्रस्ताव गुंतवणूकदारांनी नाकारले आहेत. कंपनीने SEBI ला दिलेल्या माहितीत विधान केले आहे की, Dish TV ने 26 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या AGM मध्ये भागधारकांच्या मंजुरीसाठी सहा प्रस्ताव ठेवण्यात आले होते, यामध्ये फक्त 2021-22 आणि 2022-23 साठी ‘कॉस्ट ऑडिटर’चा पुरस्कार प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
आर्थिक वर्ष 2020-21 आणि 2021-22 या कालावधीत एकल आणि एकात्मिक आधारावर वित्तीय विवरणे स्वीकारण्याचा आणि संचालक मंडळ आणि लेखा परीक्षकांच्या अहवालांना मंजुरी देण्याचा प्रस्तावही भागधारकांनी AGM मध्ये नाकारला आहे. वॉकर चंडिओक अँड कंपनी एलएलपीच्या जागी SN धवन कंपनी LLP ला वैधानिक लेखापरीक्षक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव देखील भागधारकांनी AGM मध्ये नाकारला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		