
IPO Investment | आपण सध्या पाहू शकतो की शेअर बाजारात अस्थिरतेचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र या पडझडीच्या काळातही एक कंपनी अशी आहे जी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देत आहे. ह्या कंपनीचा स्टॉक 12 दिवसांपूर्वीच शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. इतक्या कमी काळात ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे,”EP Biocomposites”. या कंपनीचे शेअर्स सलग 13 ट्रेडिंग सेशनपासून अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत.13 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचा शेअर 168.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या वेळी ज्या गुंतवणूकदारानी IPO मध्ये यात गुंतवणूक केली होती, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता दुप्पट झाले आहेत.
शेअर्सच्या किंमतीची वाटचाल :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 29 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचा शेअर BSE निर्देशांकावर 346.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच केवळ 12 दिवसात ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणूकदारांनी 105 टक्के पेक्षा अधिक नफा कमावला आहे. IPO मध्ये कंपनीच्या शेअरची इश्यू किंमत 126 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. 13 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचा शेअर 27 टक्के प्रीमियमसह 160.25 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. ज्या गुंतवणूकदारानी IPO च्या वेळी या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना आता 175 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे.
सतत अप्पर सर्किटवर ट्रेडिंग :
जेव्हापासून या कंपनीच्या शेअरने बाजारात एन्ट्री घेतली आहे, तेव्हापासून ते आतपर्यंत या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. सूचीबद्ध झाल्यापासून या कंपनीच्या शेअर्सनी रॉकेटसारखी उड्डाण भरली आहे. त्यामुळे ह्या शेअरने अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. अलीकडेच एका सिंगापूरस्थित कंपनीने ह्या स्टॉकची मोठ्या खरेदी केली आहे. Nav Capital VCC : Nav Capital Emerging Star Fund ने मागील आठवड्यात या कंपनीचे 12,000 शेअर्स 224.15 रुपये प्रति शेअर या किमतीवर खरेदी केले आहेत. परकीय गुंतवणूकदारांनीही ह्या स्टॉक वर विश्वास दाखवल्यामुळे स्टॉक मध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.