6 May 2024 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Penny Stocks | या 5 रुपयाच्या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलं, 1 लाखावर तब्बल 43 लाख परतावा दिला, स्टॉकचं नाव नोट करा

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात असे पेनी स्टॉक ट्रेड करत आहेत, जे काही रुपये किमतीवर खूप स्वस्त दरात उपलब्ध आहेत. पेनी स्टॉक बद्दल खास गोष्ट म्हणजे ह्यात गुंतवणूक करणे खूप जोखमीचे असते. कारण पेनी स्टॉकमध्ये कधी वाढ होईल किंवा घसरण होईल ह्याचा अंदाज लावता येत नाही. पेनी स्टॉक कधी कधी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडवू शकतात, किंवा कधी त्यांना करोडो रूपयांचा परतावा ही देऊ शकतात.

आज या लेखात आपण अश्या एका पेनी स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमवून दिला आहे. आपण ज्या कंपनीच्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत तिचे नाव आहे, ” Baroda Rayon Corporation “. मागील 4 महिन्यांत या कापड कंपनीच्या शेअरची किंमत 5 रुपयांवरून 200 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत बडोदा रेऑन कॉर्पोरेशन च्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4200 टक्क्यांहून अधिक नफा कमवून दिला आहे. बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 202.20 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 4.42 रुपये होती.

4 महिन्यांत 1 लाखांचे झाले 43 लाख :
1 जून 2022 रोजी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE निर्देशांकावर 4.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 सप्टेंबर 2022 रोजी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 5 टक्के अप्पर सर्किटसह 202.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्सनी मागील 4 महिन्यांत आपल्या भागधारकांना 4257 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 1 जून 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 43.29 लाख रुपये झाले असते.

कंपनीच्या शेअरची वाटचाल :
बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्सने मागील एक महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 190 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केली आहे. या कंपनीच्या शेअर्स मध्ये फक्त एका महिन्यात 191 टक्के पेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली आहे. 29 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 69.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 202.20 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असते तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.91 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Borada Rayon corporation share price return and profits on investment on 30 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x