
Home Loan | प्रत्येक सामान्य व्यक्ती घर खरेदी करताना हमखास गृह कर्ज घेत असतो. आपल्या डोक्यावर हक्काच छत असावं यासाठी मोठी मेहनत घेतो. कारण घरासाठी मोठ्या रकमेचे लोन घेतल्यावर मोठा ईएमआय भरावा लागतो. असे करत असताना बॅंक जेव्हा कर्ज देते तेव्हा त्या कर्जावर दुप्पट व्याज देखील लावते. त्यामुळे आपले जास्तीचे पैसे जात असतात. असे असले तरी स्वप्नातील घर प्रत्यक्षात घेण्यासाठी आपल्याकडे बॅंके शिवाय पर्याय नसतो.
जर तुम्ही देखील गृह कर्ज घेतले आहे आणि आता ते कर्ज पूर्ण फेडत आले आहे तर ही बातमी पूर्ण वाचा. कारण मेहणतीने घेतलेले घर या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास दुस-याच्या घश्यात जाऊ शकते. त्यामुळे नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आता सर्व माहिती निट जाणून घ्या.
कर्ज घेताना हमी म्हणून बॅंक आपल्या घराचे कागदपत्र स्वत: कडे ठेवते. कर्ज पूर्ण झाल्यावर ते सर्व कागदपत्र आपल्याला परत केले जातात. मात्र इथे तुम्हाला सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. तर तुम्ही गाफील राहिलात तर तुमची फसवणूक होऊ शकते. जेव्हा कर्ज घेतले जाते तेव्हा पजेशन लेटर, बिल्डर-बायर एग्रीमेंट, अलॉटमेंट लेटर, लीगल डाक्यूमेंट सेल डीड, सेल एग्रीमेंट अशी कागदपत्रे बॅंक आपल्याकडून घेते. त्यामुळे हे सर्व परत केले आहे की नाही हे तपासून घ्यावे.
तसेच जेव्हा आपण पूर्ण कर्ज फेडतो तेव्हा ते बॅंकेकडून लेखी घ्यावे. फायनान्शियल कंपनीकडून ड्यूज सर्टिफिकेट बॅंक आपल्याला देत असते. ते आपल्याला मिळाले आहे का हे देखील तपासावे. कर्ज घेताना अन्य संस्था प्रॉपर्टी अधिकार जोडतात ते अधिकार काडून घेतले आहेत का हे पहावे. तसे नसल्यास त्या संस्था तुमच्या घरावर स्वत: चा दावा करू शकतात.
भविष्यात तुम्हाला ती मालमत्ता विकायची असल्यास नॉन-एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेटची आवश्यकता लागते. त्यामुळे हे सर्टिफिकेट घ्यावे. तसेच शेवटी तुमचा क्रेडीट स्कोर पाहून तो अपडेट करून घ्यावा नाहीतर तुमचे कर्ज बाकी आहे असे समजले जाते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.