4 May 2024 8:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Heirship Certificate | कौटुंबिक संपत्ती नेमकी कुणाच्या मालकिची?, वारसाहक्क प्रमाणपत्र मिळवण्याची प्रोसेस पाहा फक्त एका क्लिकवर

Heirship Certificate

Heirship Certificate | एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याची संपत्ती नेमकी कुणाच्या मालकिची झाली यावरून अनेक घरांमध्ये वाद होत असतो. त्यामुळे असे वाद टाळण्यासाठी आधीच मृत्यूपत्र तयार केले जाते. मृत्यूपत्र असल्यावर वारसदार कायदा लागू होत नाही. मात्र मृत्यूपत्र नसेल तर वारसदार कायद्यानुसार मयत व्यक्तीच्या मुलांचा त्याच्या संपत्तीवर अधिकार येतो. वारसदाराची ओळख म्हणून सक्सेशन सर्टिफिकेट आणि हेअरशिप सर्टिफिकेट असणे फार गरजेचे आहे. हे दोन्ही सर्टिफिकेट पुढे अनेक ठिकाणी विचारले जाउ शकतात. ते नसल्यास तुमची कामे रखडून राहतात. जमीन, घर, दुकान या ठिकाणी आपला वारसा हक्क सांगताना हेअरशिप सर्टिफिकेट द्यावे लागते. तसेच मुदत ठेवी, बँक खाती, बँक लॉकर अशा ठिकाणी सक्सेशन सर्टिफिकेटची गरज पडते.

असे मिळवा सक्सेशन सर्टिफिकेट :
* भारतीय संहीता १९२५ च्या कलम ३७२ अन्वये सक्सेशन सर्टिफिकेट साठी अर्ज करा.
* मृत व्यक्तीचे वारदार हा अर्ज करू शकतात.
* यासाठी मृत व्यक्तीचे डेथ सर्टिफिकेट, मृत्यूची दिनांक, ठिकाण आणि पत्ता इत्यादी गोष्टी सादर कराव्या लागतात.
* सक्षम जिल्हा न्यायालयात किंवा निर्देशित न्यायालयात सक्सेशन प्रमाणपत्रासाठी अर्ज करा.
* पुण्यात सक्सेशन सर्टिफिकेट दिवाणी न्यायालयात दिले जाते.
* न्यायालयात यावर शुल्क आकारले जाते.
* खात्री पटल्यावर जजमेंट, डिक्री, इतर हुकूम यांची सही-शिक्क्याची एक प्रत अर्जदाराला  दिली जाते.
* याची मूळ प्रत कोर्ट स्वत: कडे ठेवते.
* सक्सेशन सर्टिफिकेट स्टॅम्पवर टाईप केल्यावर मूळ प्रत अर्जदाराला देण्यात येते.
* महाराष्ट्रात जास्तीत जास्त ७५०० रुपये शुल्क आकारण्यात येते.

अर्ज दाखल केल्यावर :
न्यायालयात अर्ज दाखल केल्यावर न्यायालय यावर एक पत्रक जारी करते. यात मृत व्यक्तीचे राहण्याचे ठिकाण आणि न्यायालयीन परिसरात ही माहिती प्रसारीत केली जाते. यासाठी वृत्तपत्रांची मदत घेतली जाते. ही सर्व क्रिया मृत व्यक्तीवर वारसा हक्क सांगणा-या व्यक्ती व्यतीरीक्त त्याचे आणखीन कोणी वारसदार आहेत का हे तपासण्यासाठी केले जाते. तसे कोणी समोर न आल्यास अर्ज केलेली व्यक्ती वारसदार ठरते. मात्र यात वृत्तपत्रातील माहिती पाहून कोणी समोर आले आणि दावा करणारी व्यक्ती खोटी असल्याचे समजले तर त्यावर कायदेशीर कारवाई होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Heirship Certificate process need to know 14 October 2022.

हॅशटॅग्स

Heirship Certificate(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x