15 May 2024 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

PPF Account | घरबसल्या पीपीएफ खाते करा सुरू आणि मिळवा आकर्षक सवलतींसह मोठा रिटर्न, पैसा वाढविण्याचा खात्रीशीर पर्याय

PPF account

PPF Account | सर्वसामान्य व्यक्ती एखाद्या योजनेत आपले पैसे गुंतवताना दहा वेळा विचार करतात. कारण अनेक योजना अशा असतात जिथे सुरक्षेची खबरदारी कमी असते. मात्र शासन नागरिकांसाठी नेहमी फायदेशीर आणि सुरक्षित योजना घेऊन येते. यात त्यातीलच एक पीपीएफ योजना या योजनेचा सामान्य नागरिकांपासून, गरीब आणि श्रीमंत वर्ग सर्वच लाभ घेऊ शकतात. यात दीर्घकाळासाठी छोटी गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवता येते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ या योजनेचा फायदा बॅंक आणि पोस्ट ऑफिस मार्फत मिळवता येतो. कलम ८०क अंतर्गत यात १.५ लाखांची गुंतवणूक वार्षीक असल्यास टॅक्स देखील भरावा लागत नाही. सरकारमार्फत दर तिमाहीत याचा व्यजदर ठरवला जातो.

पीपीएफचे फायदे
या योजनेचे लाभार्ती झाल्यवर तुम्हाला खूप फायदा होईल. प्रथम म्हणजे पीपीएफ खात्यावर तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा कर्ज घेता येते. तसेच दर वर्षी लागू होणा-या कर बचतीचा फायदा होतो. या योजनेत बचत करून १ कोटी पेक्षाही जास्त निधी जमा करता येतो. तसेच ही योजना पुर्णपत: सुरक्षित आहे.

घर बसल्या तुम्ही पीपीएफ खाते उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला मतदार आयडी/पॅन कार्ड/आधार कार्ड यापैकी एक ओळख पुरावा द्यावा लागेल. पासपोर्ट साइज फोटो, रहिवासी असल्याचा पुरावा, बॅंकेतून किंवा पोस्ट ऑफिसमधून मिळणारी एक पे-इन-स्लिप आणि नामनिर्देशन फॉर्मची गरज आहे. ही सर्व कागदपत्रे असल्यास पीपीएफ खाते उघडताना नेट बॅंकिंग पोर्टलवर लॉग इन करा. नंतर नवीन खात्याचा पर्याय निवडा. त्यानंतर सुचनेनुसार पुढील माहिती भरल्यावर तुमचे खाते सुरू होईल.

यावेळी ओटीपी आलेला संपर्क क्रमांक तुमच्या जवळ असने गरजेचे आहे. दीर्घकालीन गुंतवणूकीच्या विचाराने हे खाते सुरू केल्यास योजनेतील अनेक गोष्टींचा लाभ मिळेल. अनेकदा भविष्यात येणा-या आर्थिक अडचणी सोडवण्यात हे खाते तुमची मदत करेल. आधिच तुमची यात सेवींग असेल. तसेच पुढे गरज भासल्यस तुम्हाला यावर कर्ज घेता येईल. याचा व्याजदर देखील कमी आहे. त्यामुळे जास्तीचे पैसे वाया जाणार नाहीत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : PPF account is the best way to save your money 17 October 2022.

हॅशटॅग्स

PPF account(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x