
Post Office Scheme | सध्या शेअर मार्केट आणि म्यूचल फंड अशा ठिकाणी अनेक व्यक्ती पैसे गुंतवतात. यात शेअर वाढले की, तुमचे पैसे देखील झपाट्याने वाढतात. तर शेअर घासरले की, तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या पैशांपेक्षाही कमी पैसे मिळतात. यात होणारा फायदा जितका मोठा असतो. तितकीच मोठी रिस्क आणि तोटा देखील असतो. अनेक तरुण मुले मुली यात आपले पैसे गुंतवतात. अशात काही व्यक्ती अशा देखील आहेत ज्यांना आपला पैसा वाढण्याबरोबर तो सुरक्षित राहणे देखील फार महत्त्वाचे असते. त्यामुळे ते शेअर मार्केट आणि म्युचल फंड सारख्या ठिकाणी पैसे गुंतवणूक करणे टाळतात. अशाच लोकांसाठी पोस्ट ऑफिस हे एक उत्तम माध्यम आहे. कारण पोस्टात गुंतवलेले पैसे कधीच कमी होत नाहीत. थोडा वेळ लागेल मात्र यातून तुम्हाला फायदाच होईल.
पोस्ट ऑफिसमध्ये आपले पैसे गुंतवण्यासाठी अनेक योजना आहे. या विविध योजनांचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या गुंतवणूकीवर चांगले रिटर्न मिळवू शकता. पोस्ट हे सरकार मान्य आहे. त्यामुळे सुरक्षितता आणि फायदा अशा दोन्ही गोष्टी विचार घेऊन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा उत्तम मार्ग आहे. या बातमीमध्ये पोस्ट ऑफिसची अतिशय सुरक्षित आणि नफा मिळवून देणाऱ्या स्मिकची माहिती जाणून घेणार आहोत.
फक्त 100 रुपयांची करा गुंतवणूक
पोस्ट ऑफिसमध्ये स्मॉल सेव्हिंग स्कीम रिकरिंग डिपॉझिटमची आवरती ठेव म्हणजेच आरडी ही योजना सुरू आहे. यात विशेष म्हणजे फक्त 100 रुपयांपासून तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. ही स्किन पूर्णपणे सुरक्षित आहे. यात किमान 100 रुपये आहेत तर कमाल साठी कोणतीच मर्यादा नाही. यात तुम्ही 1 वर्ष कमावधी पासून 2 ते 5 किंवा 10 वर्षांचा कालावधी देखील निवडू शकता. तसेच दर तीमहीला तुम्हाला तुमच्या रकमेवर व्याज देखील मिळते.
कर्ज घेण्याची आहे मुभा
आवरती योजनेवर तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलाच्या शिक्षणासाठी देखील गुंतवणूक करू शकता. याचा फायदा तुमच्या मुलाला मोठ्या शिक्षणासाठी एडमिशन मिळवताना होईल. यात खाते उघडण्यास वयो मर्यादा १८ वर्षांच्या पुढे आहे. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर स्त्री आणि पुरुष दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यात तुमच्या ५० टक्के रकमेवर तुम्हाला कर्ज घेण्याची मुभा आहे. तसेच हे कर्ज फेडण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी देखील दिला जातो.
असे मिळवा १६ लाख रुपये
या योजनेत गुंतवणूक करणे सुरू केल्यावर जर तुम्ही महिना १६,००० रुपये भारत असाल तर वर्षाला तुमची रक्कम ९२ हजारावर जाते. १० वर्षांचा कालावधी निवडला तर १९,२०,००० रुपये एवढी रक्कम जमा होते. मॅच्युरिटीनंतर यात तुम्हाला ६,८२,३५९ रुपये मिळतात. त्यामुळे १० वर्षांच्या कालावधीत तुम्ही २६,०२,३५९ रुपये जास्तीचे मिळवू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.