8 May 2025 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Home Buying Tips | स्वतःच घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं, त्यामुळे घर खरेदी करताना या 5 टीप्स नक्की फॉलो करा

Home Buying Tips

Home Buying Tips |  कोणतीही गोष्ट खरेदी करताना सामान्य माणुस अनेक गोष्टींचा विचार करून ती वस्तू खरेदी करत असतो. यात घर खरेदी करताना तर ब-याच गोष्टी विचारात घेतल्या जातात. जर पैशांची अडचण असेल तर अनेक व्यक्ती एखाद वर्ष पुढे ढकलतात. तर काही व्यक्ती घर कर्ज काडून घेतात. घर घेताना आपण त्या शहरात आणखीन किती वर्षे राहणार आहोत. आपल्यासाठी ती जागा सोइची आहे का? अशा अनेक साध्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. मात्र या पलिकडे देखील घर खरेदी करताना काही गोष्टींवर आवर्जून विचार करायला हवा. नाहितर घर खरेदीच्या स्वप्नामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.

घराची संपूर्ण माहिती मिळवा :
घर हे १० वेळा विकत घेण्याची वस्तू नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या पोटाला चिमटा काढून राहण्यासाठी हक्काच घर घेत असतो. जर तिथे ठिक वाटत नसेल तर ते घर विकून लगेच दुसरीकडे घेता येइल असा याचा कारभार मुळीच नसतो. त्यामुळे तुम्ही जे घर घेत आहात तेथे पाणी, लाईट, वाहतूक, भाजी मार्केट अशा सुविधा आहेत की नाही हे प्रामुख्याने तपासा. तसेच पार्कंगची सुविधा आहे का हे देखील बिल्डरला विचारून घ्या. यासह मुलांसाठी शाळेची सुविधा त्या ठिकाणारपासून किती दूर आहे. तुमचे कामाचे ठिकाण देखील किती अंतरावर आहे. याची माहिती घ्या. जेव्हा बिल्डर कडून घर घ्याल तेव्हा त्याने दिलेले क्षेत्रफळ सांगितल्याप्रमाणेच आहे की नाही हे तपासा. जर तुम्ही वास्तूशास्त्रावर विश्वास ठेवत असाल तर त्या दृष्टीने देखील पहाणी करा.

रेडी टू मूव्ह की प्रकल्प
जर घर खरेदी करताना तुम्हाला घराची नितांत गरज असेल तरच तुम्ही रेडी टू मुव्ह हा पर्याय निवडा. अथवा तुम्ही प्रकल्पात देखील घर खरेदी करू शकता इथे तुमची लाखोंची बचत होण्याची शक्यता असते. प्रकल्पात घराचे बांधकाम सुरू असते त्यामुळे त्याची किंमत ही रेडी टू मूव्हच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे त्याची निवड केल्यास तुम्हाला फायदा होइल. तसेच प्रकल्पात घर खरेदी करताना दाखवल्याप्रमाणेच बांधकाम केले जाणार की नाही याची शहानीशा करा. तसेच जर तुम्ही भाडेतत्वावर ज्या घरात राहत आहात तेथे आणखीन काही दिवस राहण्यास तुम्हाला हरकत नसल्यासच प्रकल्पाची निवड करा. दिलेल्या कालावधीत जर घर मिळू शकले नाही तर त्याची नुकसान भरपाई आधीच बिल्डर कडून मंजूर करून घ्या.

गृह कर्ज घेताना याचा विचार करा
जर घर खरेदी करताना तुम्हाला गृह कर्जाची गरज असेल तर आधी तुमचा पगार किती आहे ते पाहा. त्यावर तुम्हाला मिळणा-या कर्जाचे ईएमआय भरून घर खर्चासाठी तुमच्याकडे किती पैसे शिल्लक राहतील याचे गणित समजून घ्या. जर तुम्ही कमी कर्ज कमी कालावधीसाठी घेतले तर व्याजात लागणारे पैसे तुम्हाला कमी भरावे लागतात. गृह कर्ज घेतल्यावर इतर गरजांवर त्याचा परिणाम तर होणार नाही ना हे देखील तपासा.

नोकरी आणि कमाईचे साधन
कर्ज घेताना तुमची नोकरी पक्की आहे का हे आधी पाहा. तसेच जर नोकरीवर काही बाधा आली तर कर्ज फेडण्यासाठी कमाईचा दुसरा मार्ग देखील तयार ठेवा. तसे नसल्यास नेहमी आपातकालीन गरजेसाठी पैसे जमा करा. त्यामुळे जर एकादा ईएमया भरण्यास तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही बचत केलेले पैसे वापरू शकाता. यासह तुमच्या घराची किंमत तुमच्या खिशाला परवडणारी नसेल तर दुसरे घर शोधा. जर काही कारणाने तुम्ही एका महिण्याचा ईएमआय थकवला तर तुम्हाला त्याचे जास्तीचे व्याज दंड स्वरूपात भरावे लागू शकते.

गरजेनुसार निर्णय घ्या
जर तुम्ही कामानिमित्त एखाद्या ठिकाणी भाडेतत्वार राहत असाल आणि घर घेण्याचा विचार करत असाल तर ऑफीस दूस-या शहरात जाणार आहे की नाही हे आधी तपासा. तसे असेल तर थोडा वेळ वाट पाहण्याचा पर्याय निवडा. कामाच्या अडचणीमुळे घर घेत असाल आणि ऑफिसच दुस-या शहरात शिफ्ट होणार असेल तर घेतलेल्या घरामुळे तुम्ही गुंतून पडाल. जर तुमची नोकरी बदली स्वरूपात असेल तर घर घेण्याची घाई करू नका कारण ते घर तुम्हाला कधीही सोडावे लागू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Home buying tips if you follow them you will benefit a lot 16 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Home buying tips(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या