
e-Pan Card | सध्या ऑनलाइन पध्दतीने सर्वच कामकाज करणे शक्य झाले आहे. लोकल ट्रेनचे तिकीट बूक करण्यापासून ते ऑनलाइन पध्दतीने ओषधे खरेदी करणे इथपर्यंत सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. अनेक शासकीय सेवा देखील ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामुळे माणसाचा वेळ अधिक वाचतो. आयकर विभाचे पॅनकार्ड सर्वात महत्वाचे मानले जाते. यात तुमची सर्व आर्थिक कर संदर्भातील माहिती दिली जाते. त्यामुळे पॅनकार्ड अनेक कामाच्या ठिकाणी विचारले जाते.
ऑनलाइनच्या या दुनियेत आता पॅनकार्ड सुध्दा ऑनलाइन सेवा पुरवत आहे. पॅनकार्ड असलेल्या दहा अंकी क्रमांकातच सर्व माहिती दिलेली असते. तुम्हाला देखील इ – पॅनकारड पाहिजे असेल तर या बातमीतून ते कसे मिळवायचे याची माहिती जाणून घ्या.
या संकेतस्थळावर द्या भेट
https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html इ – पॅनसाठी या संकेतस्थळावर भेट द्या. इथे आल्यावर इ – पॅनसाठी तुम्हाला दोन पर्याय दिले जातील. त्यातील एकात क्रमांक आणि दुसरा पर्याय पॅनकार्डचा असेल. तुम्हाला हवा तो पर्याय तुम्ही निवडू शकता.
असे डाउनलोड करा इ – पॅन कार्ड
* यात संकेतस्थळावर गेल्यवर तुमचा दहा अंकी पॅनकार्ड क्रमांक टाका.
* त्यानंतर तुमची जन्म तारीख, नाव ही माहिती भरून कॅप्चा फिल करा.
* विचारलेली सर्व माहिती भरा आणि सबमीट करा.
* त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर इ – पॅन कार्ड दिसेल.
* ते डाउनलोड करण्यासाठी वर दिलेल्या डाउनलोड या बटणावर क्लीक करा.