1 May 2024 4:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा?
x

पुलावामा हल्ला: देश दुःखात बुडाला, पण मोदी कॉर्बेट पार्कात शूटिंग करत होते: काँग्रेसने पुरावे दिले

Narendra Modi, Guajarat, Pulawama Attack, Bharat Pandya

नवी दिल्ली : पुलवामा जिल्ह्यात दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात १० जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देश दुःखात बुडाला असताना नरेंद्र मोदी नेमके काय करत होते याचे पुरावे सादर करण्यात आले आहे. जवान शहीद झाल्यानंतर देशात सर्वांनी एकत्र येण्याची हाक सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दिली होती. त्यानंतर विरोधकांनी देखील सामंज्याची भूमिका घेत सरकारला सहकार्य देखील केलं. वातावरण भावनिक असल्याने विरोधकांनी कोणतेही प्रश्न उपस्थित केले असते तर मोदींनी त्याच राजकारण केलं असतं हे विरोधकांना चांगलेच ठाऊक होतं. कारण, स्वतः भाजपचे नेते म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ हे सर्वच प्रमुख नेते प्रचारात व्यस्त होते. त्यात हद्द म्हणजे, दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावून स्वतः नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये प्रचारासाठी गेले आणि तेथे सुद्धा लष्कराच्या नावाने स्वतःचा आणि पक्षाचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले.

परंतु, काँग्रेसने भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या दुपट्टी राष्ट्रभक्तीचा अजून एक पुरावा सादर केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करून मोदींना चांगलेच कात्रीत पकडले आहे. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये दशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले. त्याच दिवशी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असताना किती या संवेदनशील कृत्य करत होते, याचा पुरावाच सादर केला आहे.

सुरलेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पुलवामात दुपारी ३ वाजून १० मिनिटानी दहशदवादी हल्ला झाला आणि त्यात सीआरपीएफ’चे तब्बल ४०० जवान शहीद झाले. त्यानंतर सर्व देश एकत्र आला आणि शोकसागरात बुडाला. परंतु, त्याच दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट पार्कमध्ये संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांपर्यंत शूटिंगमध्ये व्यस्त होते. देश शोकसागरात बुडालेला असताना मोदी मात्र तेथे रामनगर गेस्टहाऊसमध्ये चाय नाश्त्याचा आनंद लुटत होते. तुम्हीच जगात असा पंतप्रधान पाहिला आहे का? अशा पंतप्रधानासाठी आमच्याकडे शब्द नाही, असं ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x