12 December 2024 4:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Praveg Share Price | जबरदस्त शेअर! 4 वर्षात 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीचे झाले 54 लाख रुपये, खरेदी करावा?

Praveg Share Price

Praveg Share Price | प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 10 जानेवारी 2024 रोजी प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1300 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली. आता या कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे.

चालू आठवड्यात सोमवार आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रवेग लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला होता. आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के वाढीसह 1,191.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील पाच वर्षांत प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 54,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2019 मध्ये प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 1100 रुपये किमतीच्या पार गेले आहे.

ज्या गुंतवणूकदारानी 2019 मध्ये प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 54 लाखांपेक्षा जास्त झाले आहे. मागील एका वर्षात प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 330 टक्के परतावा कमावून दिला आहे.

प्रवेग लिमिटेड ही अहमदाबाद स्थित कंपनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात व्यवसाय करते. प्रवेग लिमिटेड कंपनी अयोध्या, कच्छचे रण, वाराणसी, दमण आणि दीव आणि सरदार सरोवा यासह विविध ठिकाणी लक्झरी टेन्ट सिटी आणि लक्झरी रिसॉर्ट चालवते.

डिसेंबर 2023 मध्ये प्रवेग लिमिटेड कंपनीने घोषणा केली होती की, कंपनीला लक्षद्वीपमधील अगाती बेटावर 50 टेन्ट बनवण्याची, त्यांचा विकास, ऑपरेशन, देखभाल आणि व्यवस्थापनाचे काम मिळेल होते. कंपनीला हे काम तीन वर्षांसाठी देण्यात आले आहे, आणि हा कालावधी दोन वर्षांनी वाढवता येईल.

प्रवेग लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे जवळपास 54.53 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 45.47 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तज्ञांच्या मते, प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स जास्त जोखीम घेणाऱ्या गुंतवणुकीसाठी चांगले आहेत. तज्ञांच्या मते, प्रवेग लिमिटेड कंपनी पर्यटन क्षेत्रातील लाभार्थ्यांपैकी एक आहे. या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांची ऑपरेशनल किंमत कमी असते, मते त्यांचा मार्जिन खूप जास्त असतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Praveg Share Price NSE Live 11 January 2024.

हॅशटॅग्स

Praveg Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x