Andheri East By Poll Assembly Election | मागील काही दिवसांपासून अंधेरीची पोटनिवडणूक चर्चेत आहे. अशात आजही या निवडणुकीची चर्चा होते आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून रविवारी पत्र लिहिलं होतं. त्यात उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता आज भाजपने उमेदवारी मागे घेतली आहे.
आता पुन्हा मुरजी पटेल यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींकडून देण्यात आल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. ते पक्ष आदेशाचा पालन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्यावर कोणताही दबाब नसून आपण अर्ज मागे घेतला आहे, असं मुरजी पटेल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय.
उद्धव ठाकरेंचं आव्हान :
तत्पूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागलं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यापेक्षा एका मैदानात, व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे”, असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं होते.
त्यावर शिंदे गटाने प्रतिउत्तर देताना म्हटले होते की, “आम्हीपण मैदानातच आहोत, घरात बसलेलो नाही. हे अडीच वर्षं घरात बसले होते, तेव्हाही आम्ही मैदानात होतो आणि आत्ताही आहोत. हे आमच्यामुळे अडीच वर्षानंतर मैदानात आले आहेत. ही क्रांती झाली नसती तर अजून अडीच वर्षं घरातच बसून राहिले असते. कोण कोणाल काय दाखवतं हे अडीच वर्षानंतर कळेलच” असं म्हटलं होतं. पण आता अडीच वर्ष राहिली बाजूला इथे शिंदे गटाने आणि भाजपने काही दिवसातच माघार घेतल्याने ‘लढून मरण्यापेक्षा पळून वाचलेले बरे’ अशी टीका समाज माध्यमांवर टीका सुरु केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Andheri East By Poll Assembly Election Mumbai check details 17 October 2022.
