
Kisan Vikas Patra| केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत अनेक अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झालेल्या तिमाहीसाठी व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सची वाढ भारत सरकारने केली आहे. ज्या अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढवण्यात आले आहे, या अल्पबचत योजनांमध्ये “किसान विकास पत्र” योजनेचाही समावेश करण्यात आला आहे. भारत सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 7.4 टक्केवरून वाढवून 7.6 टक्के पर्यंत वाढवला आहे. किसान विकास पत्रावरील व्याजदरात ही 6.9 टक्केवरून 7 टक्के पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
किसान विकास पत्र/KVP :
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना भारत सरकारच्या व्याजदर वाढीच्या निर्णयाचा दुहेरी फायदा मिळणार आहे. एक फायदा असा आहे की, त्यांना आता 6.9 टक्क्यांऐवजी ७ टक्के व्याज परतावा मिळणार आहे. किसान विकास पत्रातील पूर्वीची गुंतवणूक 124 महिन्यांत परिपक्व होत असे, पण आता ती 123 महिन्यांत परिपक्व होणार आहे. किसान विकास पत्रामध्ये इतका उत्कृष्ट परतावा मिळतो की अक्षरशः पैसे दुप्पट होतात. या योजनेत गुंतवलेल्या पैशावर भारत सरकारतर्फे सुरक्षितता प्रदान करण्यात आली आहे.
गुंतवणूकीची पात्रता :
किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान 18 वर्षे पूर्ण असावे आणि गुंतवणुकदार भारतीय नागरिक असावा. कोणतीही भारतीय व्यक्ती किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करू शकते. विशेष म्हणजे या योजनेत तुझी 1000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे यात गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही म्हणजेच तुझी कितीही रक्कम त्यात जमा करू शकता. किसान विकास पत्रामध्ये 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीच्या नावानेही खाते उघडुन गुंतवणूक करता येते, पात्र ही गुंतवणुक पालकांच्या देखरेखीखाली करता येईल.
आयकर सवलत नाही :
इंडिया पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र गुंतवणूक स्कीममध्ये आयकर सवलत देण्यात आली नाही. गुंतवणूकदाराला त्याच्या टॅक्स स्लॅबनुसार गुंतवलेली रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज यावर आयकर भरावा लागेल. मात्र, या योजनेत TDS कापला जाणार नाही.
मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढणे शक्य :
जर तुम्ही किसान विकास पत्र खरेदी केल्यानंतर 1 वर्षाच्या आत परत केले, तर त्यावर तुम्हाला कोणतेही व्याज मिळणार नाही. यासोबतच तुम्हाला काही रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. जर तुम्ही या योजनेतून अडीच वर्षांनी पैसे काढले तर त्यावर तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही आणि तुम्हाला पूर्ण व्याज परतावा मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.