12 May 2024 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

ग्रामपंचायत निवडणुका 2022 | भाजपने शिवसेना फोडून नेमकं काय साध्य केलं?, ठाकरेंच्या कामगिरीने सेना किती खोलवर रुजलीय सिद्ध झालं

Maharashtra Gram Panchayat Election 2022

Maharashtra Gram Panchayat Election 2022 | महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत जवळपास सर्वच्या सर्व ग्रामपंचायतीचे कल हाती आले असून निवडणुकीत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष (समर्थित पॅनल) ठरला आहे. तर महाविकास आघाडीने सुद्धा मोठा आकडा गाठल्याचे पाहायला मिळतंय. मात्र अधोरेखित होतेय ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कामगिरी. कारण, तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार फुटणही शिवसेनेची राजकीय मूळ किती खोलवर रुजली आहेत याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपची चिंता वाढणार आहे.

भाजप (२३९ जागा) पाठोपाठ काँग्रेस (१३९ जागा), राष्ट्रवादी, ठाकरे गट, शिंदे गट, राष्ट्रवादी या पक्षांनाही यश मिळालंय. दरम्यान, या निवडणुकीत उद्धव ठाकरे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमक्या कुणाच्या पक्षाने जास्त जागा जिंकल्या असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. पण तब्बल २/३ शिवसेना फोडूनही स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना किती खोलवर रुजवली आहे याचा प्रत्यय या निवडणुकीतील निकालातून आला आहे. कारण, तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार फुटणही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना समर्थित पॅनलने मोठी आघाडी घेतली आहे आणि त्यात शिंदे गटाला धोबी पछाड दिला आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांच्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास विकास आघाडीने ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षाने (समर्थित पॅनल) आतापर्यंत १५० जागा जिंकल्या आहेत. ठाकरे गटापाठोपाठ शिंदे गटानेही 97 जागांवर वर्चस्व मिळवलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर नेमका कुणाचा पक्ष या निवडणुकीत बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने केलेली चर्चेचा विषय ठरली आहे. परिणामी, भाजप आणि शिंदे गटाला शिवसेना पक्ष संपवणं अशक्य असल्याचं सिद्ध होतंय. त्यामुळे भाजपने शिंदेंमार्फत शिवसेना फोडून नेमका कोणता तिर मारला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मात्र या निकालांनंतर राजकीय तज्ज्ञांनी अजून एक शंका व्यक्त केली आहे. ती म्हणजे शिंदें गटाला कोणत्याही निवडणुकीत जे कमी जास्त यश मिळतंय ते केवळ त्यांच्याकडे सध्या असलेल्या मुख्यमंत्री पदामुळे, जे भाजपने त्यांना केवळ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांपर्यंत दिल्याचं म्हटलं जातंय. मात्र एकदा हे मुख्यमंत्री गेलं आणि त्यात सुप्रीम कोर्टातील निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर शिंदेंकडे सध्या असलेलं ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच पाठबळ हे हाताच्या बोटांवर मोजण्या इतकं होईल, अशी शक्यता देखील राजकीय तज्ञांनीं व्यक्त केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Gram Panchayat Election 2022 result check details 17 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x