6 May 2025 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

Fixed Deposit | टॅक्स सेव्हिंग एफडीवरही आयकर बचत कशी करावी? FD वर TDS वाचवण्यासाठी काय करावे? समजून घ्या गणित

Fixed Deposit

Fixed Deposit | सामान्यत: जेव्हा आपल्यासारखे टॅक्स सेव्हर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात, तेव्हा अनेक लोकांचा असा विश्वास असतो की त्यात टॅक्स बेनिफिट चा लाभ होईल, पण तसे नसते. तुम्हाला टॅक्स सेव्हर FD मध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्स भरावा लागतो. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केल्यावर जे व्याज मिळते, ते उत्पन्न करपात्र मानले जाते. हा व्याज तुमच्या एकूण उत्पन्ना जोडला जातो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी घाई करू नका, आणि आयकर कायदा नीट समजून घ्या.

FD मधील परतावा आणि कर आकारणी :
जर एखादा गुंतवणुकदार मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करून दर आर्थिक वर्षात 40,000 रुपये किंवा त्याहून अधिक पैसे कमावत असेल तर बँका TDS कापतात. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ही मर्यादा 50,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर आर्थिक उत्पन्न निर्धारित रकमेपेक्षा कमी असेल तर बँका तुमच्या उत्पन्नावर TDS कापणार नाही.

उदाहरणाने समजून घेऊ :
समजा एक व्यक्ती 5 वर्षांसाठी FD मध्ये गुंतवणूक करत आहे. एफडी मध्ये गुंतवणूकीची रक्कम 10 लाख रुपये असून व्याज दर वार्षिक 6 टक्के असेल तर त्या व्यक्तीचे वार्षिक व्याज उत्पन्न 60,000 रुपये होईल. म्हणजेच बँका या व्याज उत्पन्नावर 10 टक्के TDS कापतील. जर गुंतवणूकदारांनी पॅन नंबर सबमिट केले नसेल तर बँक तुमच्या FD व्याजावर 20 टक्के TDS कापतील. जर गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपयांची FD केली असेल तर वार्षिक 6000 रुपये व्याज उत्पन्न मिळेल, यावर कोणताही TDS कापला जाणार नाही.

आयकर आकारणी कशी होते?
मुदत ठेवीतील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजातून जे व्याज उत्पन्न मिळते, ते तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते, जरी तुम्हाला कर मोजणीच्या वेळी व्याज मिळाले नसले तरीही ते तुमची उत्पन्न मानले जाते. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये ‘इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न’ या शीर्षकाखाली FD व्याज दाखवले जाते, त्यानंतर तुमचे व्याज उत्पन्न कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये येते ते पाहिले जाते. आयकर विभाग तुमच्या एकूण कर दायित्वामध्ये आधीच कपात केलेला TDS समायोजित करतात. जरी बँक तुमच्या FD व्याजावर टीडीएस कापत नसली तरी आयटीआरमध्ये दाखवा. तो एकूण उत्पन्नात जोडला जातो आणि मग त्यानुसार तुमचा आयकर मोजला जातो.

समजा तुमच्याकडे एकापेक्षा अधिक FD खाती असल्यास प्रत्येक खात्यातून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर आयकर कापला जाईल. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास तुम्ही फॉर्म 15G/15H दाखल करू शकता. बँकेत फॉर्म 15Gफॉर्म/ 15H भरल्यानंतर बँक तुमच्या मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर TDS कापत नाही. बँकेशिवाय पोस्ट ऑफिसमध्येही एफडी खाते उघडता येते. येथे FD वर बँकांपेक्षा कमी TDS कापला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Fixed Deposit Return and Tax Deduction with TDS on Interest on 18 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Fixed Deposit(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या