Vikas Ecotech Share Price | एक वडापावच्या किंमतीत 5 शेअर्स खरेदी करा, हा पेनी शेअर संयम राखल्यास आयुष्य बदलू शकतो
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.49 टक्के घसरणीसह 3.30 रुपयये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 423 कोटी रुपये आहे. विकास इकोटेक कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3.25 रुपये होती. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 4.35 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 1 महिन्यात विकास इकोटेक स्टॉक 10 टक्के घसरला होता. मागील 6 महिन्यांत, विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 12 टक्के नफा मिळवून दिला आहे. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 1.52 टक्के वाढीसह 3.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की, गुरुवार 7 डिसेंबर रोजी 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कंपनीचे प्रमोटर विकास गर्ग आणि विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे 10 कोटी पूर्ण परिवर्तनीय वॉरंट होते. यापैकी कंपनीने 6 डिसेंबर 2023 रोजी 3 कोटी वॉरंट इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरीत केले होते. इश्यू किमतीनुसार 3 कोटी शेअर्सचे 75 टक्के मूल्य 7.65 कोटी रुपये आहे.
विकास इकोटेक कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत संचालकांनी 1 दर्शनी मूल्य असलेले 3.50 कोटी वॉरंट इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरीत करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.
विकास इकोटेक कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक विकास गर्ग यांना 3.50 कोटी वॉरंटसाठी 2.55 रुपये प्रति वॉरंट किमतीनुसार 8.925 कोटी रुपये अधिक लागणार आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की, या वॉरंटच्या रकमेपैकी 3.40 रुपये प्रति वॉरंटच्या इश्यू किंमतीवर 25 टक्के रक्कम भरल्यानंतर वॉरंट धारकाला त्याचे वॉरंट इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याचा हक्क मिळतो.
विकास इकोटेक लिमिटेड ही नवी दिल्ली स्थित कंपनी मुख्यतः प्लास्टिक आणि रबर क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपन्यासाठी विशेष पॉलिमर, अॅडिटीव्ह आणि रसायने उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. विकास इकोटेक कंपनीचे उत्पादने मुख्यतः भारतात कृषी क्षेत्रात तसेच, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, इलेक्ट्रिकल, फुटवेअर, ऑटोमोटिव्ह, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे या समाबंधीत व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात.
नुकताच विकास इकोटेक कंपनीने Vrinda Advanced Material Limited या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. या कंपनीची स्थपना 2007 साली करण्यात आली होती. या कंपनीचे उत्पादन केंद्र राजस्थान राज्यात स्थित आहे. ही कंपनी आपल्या उत्पादन केंद्रात विशेष पॉलिमर संयुगे, कृषी उत्पादने बनवण्याचे काम करते.
31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात विकास इकोटेक कंपनीने 192.1 कोटी रुपये कमाई केली होती. यामध्ये कंपनीने 9.35 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्यानंतर विकास इकोटेक कंपनीने.वृंदा अॅडव्हान्स्ड मटेरियल्स या कर्जमुक्त कंपनीचे अधिग्रहण केले. या नवीन कंपनीची एकूण संपत्ती 69.14 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vikas Ecotech Share Price BSE 09 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या