18 May 2024 10:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

PVR Share Price | बॉलिवूड सिनेमांची बॉक्स ऑफिसवर धमाल होताच PVR आयनॉक्स शेअर्स मजबूत तेजीत, फायदा घेणार?

PVR Share Price

PVR Share Price | सध्या अॅनिमल चित्रपटाने बॉक्स ऑफिसमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अल्पावधीत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. यावर्षी पठाण, जवान आणि गदर या ब्लॉक बस्टर चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रदर्शन केले आहे. ओटीटीच्या वाढत्या लोकप्रियतेनंतरही मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

अशा मोठ्या चित्रपटांच्या यशामुळे पीव्हीआर-आयनॉक्स कंपनीला देखील मजबूत फायदा झाला आहे. अनेक तज्ञ पीव्हीआर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहे. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी पीव्हीआर-आयनॉक्स कंपनीचे शेअर्स 0.023 टक्के वाढीसह 1,743.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअर बाजारातील तज्ञांनी पीव्हीआर-आयनॉक्स कंपनीच्या शेअरवर 2240 रुपये ते 2340 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी पीव्हीआर-आयनॉक्स स्टॉकवर 2240 रुपये टार्गेट किंमत जाहीर केली आहे. याशिवाय जेएम फायनान्शियल कंपनीने पीव्हीआर-आयनॉक्स कंपनीच्या शेअरवर 2340 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

शेअर बाजारातील 11 तज्ञांनी पीव्हीआर-आयनॉक्स स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर सात तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स घसरणीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. दोन तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे आणि एका तज्ञांने स्टॉक विकून नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे.

पीव्हीआर-आयनॉक्स कंपनीच्या प्रवर्तकांनी स्टॉक खरेदी करून आपली हिस्सेदारी 27.46 टक्केवरून 27.61 टक्केवर नेली आहे. तर परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी आपला वाटा विकून 31.20 टक्केवरून 26.83 टक्के पर्यंत घटवला आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पीव्हीआर-आयनॉक्स कंपनीचे शेअर्स खरेदी करून आपला वाटा 30.20 टक्केवरून 33.15 टक्क्यांवर नेला आहे.

शाहरुख खानचा ‘जवान’ आणि सन्नी देओलचा ‘गदर 2’ या चित्रपटांच्या यशानंतर, रणबीर कपूरचा अॅनिमल आणि विक्की कौशलचा सॅम बहादूर हे चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहेत. इतर मध्यम बजेट चित्रपट म्हणजे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘OMG2’ आणि ‘ड्रीम गर्ल’ 2′ आणि ‘फुक्रे 3’ या चित्रपटांनी देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. रजनीकांत स्टारर ‘जेलर’ चित्रपटाने देखील उत्तम कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत पीव्हीआर कंपनीसाठी चालू आर्थिक वर्षाची शेवटची तिमाही सकारात्मक ठरण्याचा अंदाज आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PVR Share Price NSE 09 December 2023.

हॅशटॅग्स

#PVR Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x