3 May 2025 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL
x

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक, शिवसैनिक गाफील?, ऋतुजा लटके आणि उद्धव ठाकरेंविरोधात दगा फटका करण्याची फिल्डिंग, गोपनीय बैठक सुरु

Andheri East By Poll

Andheri East By Poll Election | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली. भाजपच्या माघारीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपनं घेतलेल्या या भूमिकेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. तर उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’तून भाजपला कोपरखळ्या लगावत खडेबोल सुनावण्यात आलेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुरजी पटेल यांच्यासह सात जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतरही अजूनही सहाजण निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक होणार आहे. मात्र, निवडणूक होणार असली तरी ऋतुजा लटके यांचा विजय सोपा मानला जात आहे.

मात्र आता भाजपच्या वरिष्ठांनी दुसऱ्या मार्गाने ऋतुजा लटके यांच्या विरोधात दगाफटका करण्याचे आदेश स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यासाठी मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व येथील इम्पेरिअल हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. खात्रीलायक वृत्तानुसार आता ऋतुजा लटके आणि उद्धव ठाकरेंविरोधात भाजपने वेगळी रणनीती आखली आहे, त्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा विरोधात वेगळा संदेश काय द्यायचा याचं प्लॅनिंग ठरलं आहे. त्यानुसार मुरजी पटेल यांना आदेश देत पडद्याआड मतदारांना जास्तीत जास्त ‘नोटा (NOTA)’ बटण दाबण्यासाठी मतदान केंद्रावर घेऊन जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातून ऋतुजा लटके आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात रोष असल्याचा संदेश देण्याचे भाजपने ठरवले आहे आणि सर्व योजना मुरजी पटेल यांना सांगण्यात आली आहे.

त्यानुसार जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जायचं आणि ‘नोटा (NOTA)’ बटण दाबण्यासाठी तयार करायचं, तसेच अंधेरी पूर्वेत ऑनलाईन चैन मार्केटिंगने ऑडिओ क्लिप्स द्वारे मतदारांना नोटा बटण दाबण्यासाठी विनंती करणे असे फंडे फॉलो करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यात शिवसेना पूर्णपणे गाफील असल्याचं चित्र मतदारसंघात आहे. जर नोटा मतदान वाढलं तर त्यावर माध्यमांना विषय पटवून देणं आणि आमच्या उमेदवाराने माघार घेतल्याने मतदारांनी नोटा’ला पसंती दिली अशी बोंबाबोंब करण्याची संपूर्ण योजना असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. मुरजी पटेल यांच्या अत्यंत जवळील पदाधिकाऱ्याने ही संपूर्ण योजना महाराष्ट्रनामा न्यूजच्या सूत्रांना दिली आहे.

तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांना खोट्या जातीच्या दाखल्यामुळे निवडणुका लढवता येणार नाहीत. त्यामुळे या दोन्ही वॉर्डात अधिकाधिक नोटा बटण कसं दाबलं जाईल यावर त्यांनी सुद्धा लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे आता अंधेरी पूर्वेतील पदाधिकारी ते स्वतः उद्धव ठाकरे हा विषय किती गांभीर्याने घेतात ते पाहावं लागणार आहे.

Murji Patel

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Andheri East By Poll Election Audio clips from BJP party workers check details 18 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Andheri East By Poll(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या