3 May 2024 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Beauty Tools for Glowing Skin | सौंदर्य साधनांचा वापर त्वचेच्या समस्यांनुसारच, 'या' फेशियल टूल्सने वाढवा चेहऱ्याचे सौदर्य

Beauty Beauty Tools for Glowing Skin

Beauty Tools for Glowing Skin | त्वचेचे सौदर्य वाढविण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग करत असतात मात्र त्याचा त्वचेला हानी सुद्धा होऊ शकते. अनेकदा ब्युटीशियन फेशियल किंवा स्किन ट्रीटमेंट करताना आणि वेगवेगळ्या टूल्सचा वापर करतात, मात्र आजकाल स्त्रियाही याचा वापर घरामध्ये मोठ्या प्रमाणात करत आहेत. तसेच सौंदर्य साधनांचा वापर त्वचेच्या समस्यांनुसारच केला जातो आणि त्यामुळेच असे उत्पादन अतिशय काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. तर चला जाणून घेऊया त्वचेच्या समस्यांवर कोणत्या साधनांनी उपचार करता येतो.

गुआशा टूल्स त्वचा घट्ट ठेवतील:
गुआशा सौंदर्य साधनांचा वापर आजकाल खूप चर्चेमध्ये आहे कारण हे साधन 30 वर्षे ओलांडलेल्या महिलांवर खुप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तसेच ते सैल त्वचा घट्ट करण्यासाठी उपयोगी ठरते. हे त्वचा उपचार आणि विश्रांतीसाठी वापरले जाते आणि गुआ शा टूल वापरल्याने चेहऱ्यावरील सूज देखील कमी होते.

आपल्या वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर बारीक रेषा दिसायला लागतात आणि बारीक रेषा काढण्यासाठी डर्मारोलर्स हा एक उत्तम पर्याय आणि साधन आहे. याच्या वापराने आपली त्वचा स्वच्छ आणि गुळगुळीत होते. डर्मारोलर्समध्ये असलेल्या लहान सुया त्वचेवर हलवल्याने, कोलेजन वाढते व ज्यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी होऊ लागतात. गुळगुळीत आणि तेजस्वी त्वचेसाठी डर्मारोलर्स वापरणे खूप फायदेशीर आहे.

जेड रोलर्स हे चेहऱ्यावरील सूज दूर करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे कारण तुम्हाला चेहऱ्याच्या सूजाने त्रास होत असेल तर तुम्ही जेड रोलर्स वापरू शकता. जेड रोलर्सना चेहर्यावरील मसाज टूल्स म्हणून ओळखले जाते आणि जेड रोलर्स त्वचा गुळगुळीत करते. याचा वापर केल्याने चेहऱ्यावरील सूज कमी होते व जेड रोलरवर मॉइश्चरायझर किंवा सीरम लावून चेहऱ्याला मसाज करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Beauty Tools for Glowing Skin Checks details 19 October 2022.

हॅशटॅग्स

Beauty Beauty Tools for Glowing Skin(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x