10 May 2024 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा Post Office Scheme | मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, मिळेल 8.2% परताव्याची हमी Income Tax Refund | पगारदारांनो! ITR भरल्यानंतर 'हे' काम केल्यास तुम्हाला टॅक्स रिफंडचे पैसे लवकर मिळतील Swift Price | फक्त 65000 रुपयांमध्ये नवी स्विफ्ट घरी आणा, केवळ एवढा असेल EMI, सर्व व्हेरियंट डिटेल्स जाणून घ्या Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट
x

Delhivery Share Price | देल्हीवरी शेअर 2 दिवसात 30% क्रॅश, गुंतवणूदारांच्या टेन्शनची कारणं आणि नेमका काय निर्णय घ्यावा?

Delhivery Share Price

Delhivery Share Price | Delhivery ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी पूर्णपणे एकात्मिक लॉजिस्टिक सेवा देणारी कंपनी आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लॉजिस्टिक फर्म Delhivery च्या शेअर्समध्ये कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांनी पडले असून त्याची किंमत सध्या 377 रुपयांवर आली आहे. या स्टॉकने आपली सर्वकालीन विक्रमी नीचांकी किंमत पातळी गाठली आहे. मागील 2 दिवसांत स्टॉक 30 टक्क्यांहून अधिक पडला आहे. हा स्टॉक आपल्या मागील 1 वर्षाच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 47 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. 21 जुलै रोजी या कंपनीच्या शेअरने 709 रुपयांची उच्चांक पातळी किंमत गाठली होती.

किमतीत जबरदस्त घट : 24 मे 2022 रोजी Delhivery कंपनीचा शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला होता. या शेअरची IPO इश्यू किंमत 487 रुपये होती, तर स्टॉक 541 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. हा स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 10 टक्क्यांचा जबरदस्त वाढीसह 541 रुपयांवर बंद झाला होता. 21 जुलै रोजी स्टॉकने 709 रुपयेची किंमत स्पर्श केली, जी त्याची एका वर्षातील उच्चांक किंमत होती. आता हा स्टॉक 377 रुपयांपर्यंत कोसळला आहे.

Delhivery कंपनीचा मुख्य व्यवसाय एक्सप्रेस पार्सल डिलिव्हरी, भारी मालवाहू डिलिव्हरी आणि गोदामांसह लॉजिस्टिक सेवांची संपूर्ण शृंखला सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय आहे. या कंपनीकडे सध्या डायरेक्ट-टू-कंझ्युमर ई-टेलर्स, ई-कॉमर्स मार्केटप्लेस आणि अशा विविध छोट्या-मोठ्या उद्योगांमधून 23,000 हून जास्त ग्राहक वर्ग आहेत.

शेअर घसरण्याचे कारण :
या कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, पुढील येणाऱ्या काळात महागाई वाढल्यामुळे कंपनीच्या उत्पादनाच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित आर्थिक वर्षात या कंपनीच्या शिपमेंटमध्ये कमी ते मध्यम आकारात वाढ होण्याचा अंदाज आहे.

बिझनेस अपडेट : जुलै-सप्टेंबर 2022 च्या बिझनेस अपडेटमध्ये कंपनीने माहिती दिली आहे की, वाढत्या महागाईमुळे लोक फक्त जीवनावश्यक गोष्टींवरच लागेल तेव्हा खर्च करत आहेत. पावसामुळे पार्सल आणि डिलिव्हरी सेवाही प्रभावित झाली. सणासुदीचा हंगाम असूनही, प्रति वापरकर्ता आणि एकूण सक्रिय खरेदीदारांचा खर्च जवळजवळ सपाट किंवा कमी राहिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Delhivery Share Price return on investment has fallen down since last few months on 22 October 2022

हॅशटॅग्स

#Delhivery Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x