2 May 2024 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

भाजपचा प्रतिवर्षी 2 कोटी रोजगार? गुजरात निवडणुकीमुळे 75 हजार नियुक्तीपत्रांचा इव्हेन्ट? बिहारने 3 महिन्यात 9500 नियुक्तीपत्र दिली

PM Narendra Modi

Rojgar Event | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात १० लाख जवानांसाठी भरती मोहीम राबवणार असल्याचं म्हटलं. या सोहळ्यादरम्यान ७५ हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

प्रतिवर्षी २ करोड रोजगार देण्यात नापास आणि गुजरात निवडणूक कनेक्शन:
वास्तविक भाजप सरकारने देशात प्रतिवर्षी २ करोड रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यात मोदी सरकार पूर्णपणे नापास झाल्याचं समोर आलं आणि हाच बेरोजगारीचा मुद्दा सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रमुख मुद्दा झाल्याने स्वतः पंतप्रधान मोदींना गुजरातमध्ये ठाण मांडून इव्हेन्ट करण्याची वेळ आल्याची चर्चा दिल्लीत आणि गुजरातमध्ये रंगली आहे. यासाठी सर्व माध्यमांना LIVE करण्याचे आदेश देण्यात आले होते.

38 मंत्रालय आणि विभागांमध्ये होणार नियुक्त्या
भारत सरकारच्या ३८ मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये देशभरातून निवडक नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गट-अ, गट-ब (राजपत्रित), गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क अशा विविध पातळ्यांवर नवनियुक्त कर्मचारी शासनामध्ये रुजू होणार आहेत. ज्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यात केंद्रीय सशस्त्र दलाचे कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, एमटीएस आदींचा समावेश आहे.

बिहारमध्ये ३ महिन्यात 9500 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र
बिहारसह हिंदी भाषिक राज्यांमध्ये सरकारी नोकऱ्या हा मोठा प्रश्न आहे. बिहारमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी केंद्र आणि बिहार सरकारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना प्रतिवर्ष २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र तसं न झाल्याने आणि गुजरात निवडणुकीत बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा झाल्याने आज म्हणजे शनिवारी 10 लाख नोकऱ्यांची नियुक्तीपत्र देण्याचा इव्हेन्ट आखण्यात आल्याची चर्चा पत्रकार आणि सामान्य लोकांमध्ये सुरु झाली आहे. दुसरीकडे, बिहारमध्ये सत्तापालट होऊन अवघे ३ महिने झाले आहेत, तसेच वर्षाला १० लाख रोजगार देण्याचं आश्वासन जेडीयू आणि आरजेडी सरकारने दिले होते. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारीच सुमारे 9500 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र दिली आहेत. बिहारमध्ये तीन ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sarkari Naukari PM Narendra Modi Rojgar Mela check details 22 October 2022.

हॅशटॅग्स

#PM Narendra Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x