
Multibagger Stocks | दिग्गज गुंतवणूकदार सचिन बन्सल यांनी पेपर कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे नाव आहे, “वेस्ट कोस्ट पेपर मिल्स लिमिटेड”. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत प्रसिद्ध गुंतवणुकदार सचिन बन्सल यांनी वेस्ट कोस्ट पेपर मिल्स लिमिटेड कंपनीचे 1.8 दशलक्ष शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडले आहेत. या कंपनीमध्ये त्यांचा एकूण 2.73 टक्के वाटा आहे. ट्रेंडलाइन डेटानुसार जून 2022 च्या तिमाहीच्या शेवटी सचिन बन्सल यांची 4 कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक होती. सचिन बन्सल यांच्या पोर्टफोलिओ मध्ये वेस्ट कोस्ट पेपर मिल्सचे शेअर्स खरेदी केल्यानंतर हा दुसरा पेपर स्टॉक ठरला आहे. बन्सल यांच्याकडे JK पेपर कंपनीचे शेअर्सही आहेत.
शेअरधारक डेटा लिस्ट :
जून तिमाहीत सचिन बन्सल या कंपनीच्या वैयक्तिक भागधारकांच्या यादीत नव्हते. सप्टेंबर 2022 तिमाहीमधील वेस्ट कोस्ट पेपर मिल्स लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार, सचिन बन्सल यांच्याकडे कंपनीचे 1.8 दशलक्ष शेअर्स होते. कंपनीत त्यांची एकूण गुंतवणूक 2.73 टक्के आहे. जून 2022 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटामधील वैयक्तिक भागधारकांच्या यादीत सचिन बन्सलचे नाव नव्हते, यावरून असे कळते की सचिन बन्सल यांनी सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. तथापि, सचिन बन्सलने वेस्ट कोस्ट पेपर मिल्सचे शेअर्स एकाच वेळी विकत घेतले नाही, तर त्यांनी सप्टेंबरच्या तिमाहीत शेअर्स तुकड्यांमध्ये खरेदी केले होते.
2 वर्षांत 350 टक्के परतावा :
वेस्ट कोस्ट पेपर मिल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी चालू वर्षात आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी चालू वर्षात आतापर्यंत 149 टक्के नफा मिळवून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी या पेपर कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 234.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 585 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील दोन वर्षांत वेस्ट कोस्ट पेपर मिल्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 124 रुपयांवर ट्रेड करत होते, ते 585 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 653.20 रुपये आहे. त्याच वेळी, वेस्ट कोस्ट पेपर मिल्सच्या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 215 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.