20 May 2024 4:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Stock in Focus | हा शेअर क्रॅश, किंमत 73 टक्क्याने घसरली, हा स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? तज्ञ काय सल्ला देतात पहा

Stock In Focus

Stock in Focus | पॉलिसी बाजार म्हणजेच पीबी फिनटेक कंपनी विविध कंपन्यांच्या विमा उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणारी प्लॅटफॉर्म आहे. मागील 5 वर्षांपासून कंपनीवर कोणतेही कर्ज नाही, मात्र पॉलिसीबाजार डॉट कॉमचे शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 73 टक्क्यांनी गडगडले आहेत. म्हणजेच ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 27 हजारांवर आले असणार. पॉलिसी बाजार कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1470 रुपये आहे, आणि तर तिची सध्याची ट्रेडिंग किंमत आणि नीचांक पातळी किंमत 398.25 रुपये आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 6.18 टक्क्यांनी कमजोरी 400.75 रुपयांवर ट्रेड करत होता, आणि दिवसा अखेर याच किमतीवर क्लोज झाला.

पॉलिसी बाजार शेअरची कामगिरी :
पॉलिसी बाजार कंपनीच्या स्टॉकचा चार्ट पॅटर्न पाहिल्यास आपल्या कळेल की हा स्टॉक मागील एका आठवड्यात 11.46 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. त्याच वेळी, मागील एका महिन्यात पॉलिसी बाजारच्या शेअरच्या किमतीत 21.63 टक्क्यांनी पडझड पाहायला मिळाली होती. मागील 3 महिन्यांत या शेअरची किंमत 23.56 टक्क्यांनी खाली आली होती. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या पॉलिसी बाजार कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 48.62 टक्के कमी झाले असते.

पॉलिसी बाजारच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठी पडझड झाली असली तरी स्टॉक बाजार तज्ज्ञ या शेअरबाबत उत्साही दिसून येत आहेत. गुंतवणूक तज्ञ या स्टॉक खरेदीची शिफारस करत आहेत. त्याच वेळी, अनेक तज्ञांनी हा स्टॉक दीर्घकाळासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला असून काहींनी स्टॉक वाढल्यावर बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांचे मत त्यांचे वैयक्तिक मत आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या तुमच्या सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Policy Bazaar Stock Price in focus after falling down on all time low level 23 October 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x