
Multibagger Stocks | Syn Bags Limited कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी असून तिने दिवाळीपूर्वी आपल्या शेअर धारकांना मोठी भेट दिली आहे. या कंपनीने 22 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच शनिवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. विद्यमान गुंतवणूकदारांना कंपनीच्या प्रत्येक शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत दिले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या बोनस शेअरबद्दल तपशीलवार माहिती
कंपनीने BSE ला सादर केलेल्या अहवालात माहिती दिली आहे की,“कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्स देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. मात्र, या कंपनीने अद्याप कोणतीही रेकॉर्ड तारीख जाहीर केली नाही. 21 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरीत केले जातील असे जाहीर केले आहे. म्हणजेच कंपनी रेकॉर्ड तारीखही लवकरच जाहीर करेल.
कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
मागील क्लोजिंग किमतीच्या तुलनेत, Syn Bags Limited चे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.85 टक्क्यांच्या वाढीसह 304.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 5 वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरची किमत 571.37 टक्क्यांनी वर गेली आहे. त्याच वेळी, जर आपण मागील 3 वर्षाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर कंपनीच्या शेअरमध्ये 606 टक्के वाढ दिसून येईल. मागील वर्ष गुंतवणूकदारांसाठी थोडाफार चांगला गेला होता. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 100.07 टक्क्यांनी वाढ दिसून आली होती. 2022 या वर्षात आतापर्यंत Syn Bags Limited च्या शेअरची किमत 13.77 टक्क्यांनी वधारली आहे. कंपनीच्या प्रमोटर्सची कंपनीत 58.66 टक्के गुंतवणूक आहे.
कंपनी बद्दल थोडक्यात :
कंपनी मुख्यतः FIBC, बिग बॅग आणि फूड ग्रेड चे उत्पादन आणि निर्यात करते. कंपनीचे मुख्यालय इंदूर येथे आहे. त्याच वेळी, कंपनीचा व्यापार विस्तार यूके, बेल्जियम, हंगेरी, सेनेगल, थायलंड, आयर्लंड, डेन्मार्क, यूएसए, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, यूएसए, स्पेन यासारख्या अनेक देशांत पसरलेला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.