LIC Share Price | LIC IPO गुंतवणूक डोक्याला ताप झाली? राहुल गांधींनी आधीच अलर्ट दिलेला, आता लॉकइन टर्मही संपला, पुढे काय?
LIC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कंपनीच्या शेअर्सचा पूर्व निर्धारित लॉकइन कालावधी आता संपला आहे. आज एलआयसी स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. लॉकइन कालावधी संपल्यानंतर 126.50 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 20 टक्के स्टेक ट्रेडिंगसाठी ओपन होणार आहेत.
एलआयसी कंपनीचा IPO हा भारतातील आतपर्यंतचा सर्वात मोठा IPO होता, जो की एक फ्लॉप IPO ठरला होता. या कंपनीचा IPO 17 मे 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. एलआयसी कंपनीचा IPO 2.95 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. IPO च्या माध्यमातून कंपनीने 21,008.48 कोटी रुपये भांडवल जमा केले होते. आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी एलआयसी स्टॉक 0.30 टक्के घसरणीसह 606.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
13.94 Lakh Employed
30 Crore Policyholders
39 Lakh Crore in Assets
World #1 – ROI for ShareholdersYet, Modi Govt has undervalued LIC. Why is one of India’s most valuable assets being sold at a throwaway price?#JanDhanLootYojana
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2022
एलआयसी कंपनीचा IPO हा आजपर्यंतचा भारतातील सर्वात मोठा IPO म्हणून लाँच करण्यात आला होता. सध्या LIC स्टॉक 606 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मते IPO मध्ये या शेअरची 949 रुपये निश्चित करण्यात आली होती. या इश्यू किमतीच्या तुलनेत एलआयसी IPO 36 टक्के घसरला आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत LIC च्या प्रीमियम उत्पन्नात घट झाल्यामुळे कंपनीचा नफा 7,925 कोटी रुपयेवर आला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत एलआयसी कंपनीने 15,952 कोटी रुपये नफा कमावला होता. सप्टेंबर तिमाहीत एलआयसी कंपनीचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न 19 टक्क्यांच्या घसरणीसह 1.07 लाख कोटी रुपये नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच तिमाहीत 1.32 लाख कोटी रुपये होते.
मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, आर्थिक वर्ष 2023-25 या कालावधीत एलआयसी APE मध्ये 3 टक्के CAGR योगदान देण्याची शक्यता आहे. तज्ञांनी एलआयसी स्टॉकची कामगिरी पाहून, शेअरवर 850 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. Emkay Global फर्मने एलआयसी स्टॉकवर 760 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | LIC Share Price NSE 14 November 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा