6 May 2024 6:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

ऐतिहासिक महागाईने पेट्रोल पंपावर मोदींचे फोटो पाहून लोकांचा संताप होतोय, आता नोटांवर मोदींच्या फोटोसाठी भाजपची मागणी

Currency Note

MLA Ram Kadam | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत असं अजब वक्तव्य उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याकडून करण्यात आलं आहे. गुलाब देवी यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत. असं गुलाब देवी यांनी म्हटलं आहे. गुलाब देवी एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर मोदी हवं तोपर्यंत पंतप्रधान पदावर राहू शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता गुलाब देवी यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असून, विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवू शकतात. यापूर्वी देखील अनेकदा असे वाद निर्माण झाले आहेत. त्यानंतर अजून अजब मागण्या पुढे येतं आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्विवाद महापुरुष आहेत. पण मोदी केव्हा महापुरुष झाले? कारण सतत वायफळ मुद्यांवर केंद्रित असणारे भाजपचे आमदार राम कदम पुन्हा त्यांच्या संतापजनक मागणीने चर्चेत आले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबतच गणपती बाप्पा आणि लक्ष्मी यांचे फोटो असावेत अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे. यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांकडूनही नोटांवर फोटो लावण्यासाठी पर्याय सुचवले जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवरायांचा फोटो चलनी नोटांवर असावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी तर कोणत्या महापुरूषांचे फोटो नोटांवर असावेत त्याचे पर्यायच दिले आहेत.

काय आहे राम कदम यांचं ट्विट?
अखंड भारत, नया भारत, महान भारत जय श्रीराम, जय मातादी! अशा ओळी लिहित राम कदम यांनी चलनी नोटांचे चार पर्याय दिले आहेत.

* पहिल्या पर्यायावर छत्रपती शिवरायांच्या फोटोचा आहे.
* दुसरा पर्याय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा आहे
* तिसरा पर्याय हा वीर सावरकर यांच्या फोटोचा आहे
* चौथा पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा आहे

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Currency Note Modi Ram Kadam demands check details 27 October 2022.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x