
Hakkasod Patra | घर, संपत्ती, जमिन अशा अनेक गोष्टी आपल्याला वारसा हक्कात मिळत असतात. अनेकदा कुटूंब मोठे असल्यास मुली आपल्या भावासाठी वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीवरील वारसा हक्क सोडतात. असे केल्यावर त्या संपत्ती संदर्भातील व्यवहारात वारसा हक्कसोड पत्र सादर करावे लागते. तर हक्कसोड पत्र नेमके कसे मिळवायचे हेच या बातमितून सविस्तर जाणून घेऊ.
वारसा हक्कसोड पत्र फक्त त्या त्या कुंटूबातीलच व्यक्तीला दिले जाते. कुटूंबा बाहेरील कोणत्याही व्यक्तीचा त्यावर अधिकार नसतो. वडिलोपार्जी मिळणा-या संपत्तीवरील आपला हक्क मागे घेतल्यास हे पत्र दिले जाते. यात स्त्री आणि पुरूश दोघीही हक्क सोड पत्रासाठी अर्ज करू शकतात.
यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाते नाही. कारण तुम्ही तुमचा हक्क यातून काढून घेत असता त्यामुळे तुम्हाला मुद्रांक शुल्क भरावे लागत नाही. ही बाब लक्षात ठेवा. फक्त हक्कसोड पत्र ग्राह्य धरले जात नाही. यासाठी तुम्हाला त्याची नोंदणी करावी लागते. नोंदणी शुल्क तुम्हाला स्वत: भरणे गरजेचे आहे. नोंदणीकृत हक्कसोड पत्र असेल तरच ते पत्र ग्राह्य धरले जाते.
जेव्हा तुम्ही तुमच्या कुटूंबातील एका व्यक्तीच्या फायद्यासाठी तुमचा हक्क सोडत असता तेव्हा लाभ घेणा-या व्यक्तीचे सहमती पत्र महत्वाचे असते. हे सहमतीपत्र साधारणता २०० रुपयांच्या स्टॅंप पेपरवर असावे. तसेच हक्कसोड पत्र जी व्यक्ती देत आहे त्याचे नाव, पत्ता, व्यवसाय किंवा नोकरी याची माहिती द्यावी लागते. तसेच तुमची वंशावळ, एकत्र कुटूंबातील हिस्सा निहाय विवरण कसे आहे. कोणाच्या वाट्याला किती हिस्सा आहे हे सादर करावे लागते.
तसेच ही सर्व प्रक्रिया होत असताना तुमचे विश्वालातले दोन साक्षीदार हवे असतात. यावेळी त्या साक्षीदारांचे नाव. पत्ता, नोकरी/ व्यवसाय, स्वाक्षरी या गोष्टी नमुद केल्या जातात. त्यानंतर हे सर्व कागदपत्र तलाठी कार्यलयात जमा करावे. यावर पुढे २ आठवड्यांच्या कालावधीने तुम्हाला हक्कसेड पत्र दिले जाते.
हक्कसोड पत्र मिळाल्यावर लगेचच त्याची नोंद करणे आवश्यक आहे. नोंदणी कार्यालयात हक्क सोडलेल्या व्यक्तीने नोंदणी करुण घ्यावी. तेव्हाच याचा उपयोग होतो. फक्त हक्कसोड पत्र असेल आणि त्याची नोंदणी नसेल तर ग्राह्य मानता येत नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.