9 May 2024 8:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

शिंदे गटातील मंत्र्याकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला निधी, शिंदे समर्थक आमदारांना पाडण्यासाठी शिंदेंच्या मंत्र्यांची फिल्डिंग, राष्ट्रवादीशी जवळीक

MLA Chimanrao Patil

MLA Chimanrao Patil | शिवसेनेतील फुटीनंतर 40 आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं आहे. मात्र मंत्री पदाच्या वाटपासूनच शिंदे गटात वाद सुरु असल्याची चर्चा सुरुवातीपासून आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मुलाच्या गटात पाणीपुरवठ्याचे कामे दिल्याने या दोघांमध्ये संघर्ष वाढला आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला, त्याच पक्षातील माझ्या प्रतिस्पर्धी आमदाराला निधी द्यायचा, व त्यांना मोठं करायचं, ही चुकीची बाब असल्याचं सांगत चिमणरावांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे. सरकारला १०० दिवस पूर्ण होत नाहीत, तोच शिंदे गटातील आमदार एकमेकांना भिडले असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गटातील मंत्री व आमदारांच्या या नाराजी नाट्यामुळे जळगाव जिल्ह्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.

एका सरकारमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते बनवण्यात प्रत्येकाचा वाटा असतो. एकेक मतावर सरकार येत आणि कोसळतं. त्यामुळ कोणी मंत्री झाला तर सरकार त्याची खासगी मालमत्ता नसते. सर्व मिळून सरकार आलेलं असतं आणि म्हणून तुम्ही मंत्री आहात याचं भान कायम ठेवलं पाहिजे. माझ्यावर अन्याय झाल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांना फोन केला. त्यांनी फोनवर यापुढे असं व्हायला नको असं सांगितलं. मला डावलण्याचा त्यांचा काय संबंध? ते डावलतात हे एकदम चुकीचे आहे,” असा रोष चिमणराव पाटील यांनी व्यक्त केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MLA Chimanrao Patil angry on Shinde camp minister Gulabrao Patil check details 27 October 2022.

हॅशटॅग्स

#MLA Chimanrao Patil(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x