4 May 2024 3:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

बाळासाहेबांचा 32 वर्षाचा नातू शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतोय, तर शिंदे समर्थक कृषिमंत्र्यांची चहा पित अधिकाऱ्यांशी 'दारू पे चर्चा'

Abdul Sattar

MLA Bacchu Kadu | अतिवृष्ठीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं हाती आलेलं पिक आडवं झालंय. दिवाळी सणाच्या तोंडावरच अस्मानी संकटात उद्धवस्त झालेल्या बळीराजाच्या बांधावर उद्धव ठाकरे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परीषद घेऊन राज्य सरकारकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

शेतकरी प्रतिक्षेत असताना राज्य सरकारकडून मदतीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यादरम्यान आमदार आदित्य ठाकरे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत, प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, अतिृवृष्टीची पाहणी करायला आल्यानंतर कृषी मंत्री चक्क दारूच्या गप्पा मारत असल्यामुळे बळीराजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. कृषी मंत्र्यांनी थेट जिल्हा अधिकारी यांना सर्वांसमोर विचारलं की, दारु घेता का? यावर जिल्हा अधिकाऱ्यांनीही प्रामाणिकपणे कधी कधी थोडी घेतो, असं उत्तर दिलं. जिल्हा अधिकारी राधा विनोद शर्मा आणि कृषी मंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सत्तार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?,’ असा प्रश्न उपस्थित करत कविता ट्विट केली आहे. “गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब, किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब, एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो, हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो,” असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Alcohol Abdul Sattar question district collector Beed check details 27 October 2022.

हॅशटॅग्स

#Abdul Sattar(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x