19 May 2024 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

Stock In Focus| हा मल्टीबॅगर बँकिंग स्टॉक 66 रुपयांवर जाऊ शकतो, स्टॉकची किंमत सध्या खूप कमी असून तज्ञ खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत

Stock In Focus

Stock In Focus | जर तुम्ही कमी किमतीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एका मुंबईस्थित बँकेच्या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. शेअर बाजारातील तज्ज्ञ या शेअरबाबत उत्साही आणि सकारात्मक दिसून येत आहेत. सप्टेंबर तिमाहीतील शानदार निकालानंतर IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स तेजीत वाढण्याची शक्यता आहे. सध्या IDFC फर्स्ट बँकेचे शेअर 56.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. फिलिप कॅपिटल फर्मने IDFC फर्स्ट बँकेच्या शेअर्स साठी 66 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या ट्रेडिंग किमतीच्या 15 टक्के जास्त आहे.

चार महिन्यांत दिला 100 टक्के परतावा :
आयडीएफसी फर्स्टच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी दिसून आली आहे. IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स मागील 4 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 100 टक्के पेक्षा अधिक वाढले आहेत. हा स्टॉक आता मल्टीबॅगर स्टॉक म्हणून नावाजला आहे. सोमवारच्या मुहूर्त ट्रेडिंग सेशन दरम्यान IDFC फर्स्ट बँकेच्या शेअर्सने BSE निर्देशांकावर 59.40 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी गाठली आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स वर्ष-दर-वर्ष वाढ या सरासरीने 17.5 टक्के दराने वाढले आहेत. IDFC First बकेच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 101.5 टक्केचा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 22 जून 2022 रोजी IDFC बँकेच्या शेअरने आपली 28.95 रुपये ही 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी गाठली होती.

सप्टेंबर तिमाहीचा बंपर नफा :
IDFC फर्स्ट बँकेने Q2FY23 मध्ये एकूण 556 कोटींचा निव्वळ नफा कमावला असल्याचे तिमाही निकालात जाहीर केले आहे. हा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच कालावधीत 152 कोटी रुपये होता. त्याच वेळी बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न/NII आर्थिक वर्ष 2012 च्या दुसर्‍या तिमाहीत 2,272 कोटी रुपये होते जे 2022 च्या दुसर्‍या तिमाहीत 32 टक्के वाढून 3,002 कोटी रुपये झाले आहे. IDFC बँकेचा निव्वळ व्याज मार्जिन या तिमाहीत 5.98 टक्के वाढला असून आर्थिक वर्ष 2022-23 च्या Q2 मध्ये 5.83 टक्के आणि आर्थिक वर्ष 2023 च्या Q1 मध्ये 5.89 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IDFC First Bank Stock In Focus of Stock market expert for investment and huge returns in short term on 29 October 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x