6 May 2024 7:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Multibagger Stocks | फक्त 10,000 रुपये गुंतवणुकीवर 7 लाख रुपये परतावा देणारा शेअर 41% स्वस्त झाला आहे, खरेदी करावा?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | एस्टेक लाइफ सायन्सेस या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7000 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी एस्टेक लाइफ सायन्सेस कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी एस्टेक लाइफ सायन्सेस स्टॉक 1.50 टक्के घसरणीसह 1,152.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एस्टेक लाइफ सायन्सेस कंपनीचे शेअर्स 1171.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमवून दिला आहे. एस्टेक लाइफ सायन्सेस ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 2297 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः कृषी रासायनिक घटक तयार करण्याचा व्यवसाय करते.

मागील एका वर्षभरात एस्टेक लाइफ सायन्सेस कंपनीचे शेअर्स 41 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका महिन्यापासून एस्टेक लाइफ सायन्सेस कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1050 रुपये होती. या कंपनीने एकूण 13 वेळा आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप केला आहे. 16 ऑगस्ट 2010 ते 26 जुलै 2023 दरम्यान एस्टेक लाइफ सायन्सेस कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एकूण 13 वेळा लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment on 04 December 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x