9 October 2024 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

Credit Card | क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अप्लाय करताना 'हे' डॉक्युमेंट्स असणं अत्यंत गरजेचं आहे, जाणून घ्या - Marathi News

Highlights:

  • Credit Card
  • ओळखपत्र :
  • वार्षिक ITR :
  • ऍड्रेस प्रूफ :
  • एप्लीकेशन फॉर्म :
  • लेटेस्ट सॅलरी स्लीप :
  • बँक स्टेटमेंट :
  • पासपोर्ट साईज फोटो :
Credit Card

Credit Card | आज-काल क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड सुरू आहे. अनेक तरुण-तरुणी शॉपिंगसाठी क्रेडिट कार्ड वापरतात. कारण की क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो. फक्त शॉपिंगच नाही तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे पेमेंट क्रेडिट कार्डमार्फत अगदी सहजरीत्या करू शकता. तुमच्याजवळ क्रेडिट कार्ड नसेल आणि क्रेडिट कार्ड कसे मिळवायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर, चिंता करण्याचे काही गरज नाही. आज आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्डसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात याबद्दल माहिती सांगणार आहोत.

ओळखपत्र :
तुम्ही बँकेकडून किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडून क्रेडिट कार्ड बनवून घेत असाल तर, तुम्हाला तुमचे ओळखपत्र द्यावे लागेल. ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या ओळखपत्रांचा समावेश असू शकतो.

वार्षिक ITR :
तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये नोकरी नाही तर, स्वतःचा व्यवसाय करत असाल तर, तुम्हाला तुमचं वार्षिक आयटीआर जमा करावं लागेल.

ऍड्रेस प्रूफ :
क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला एखादा ऍड्रेस प्रूफ द्यावा लागेल. यामध्ये तुम्ही आधार कार्ड, लाईट बिल किंवा राहत असणाऱ्या ऍड्रेसचा कोणताही अधिकृत कागद तुम्ही जमा करू शकता.

एप्लीकेशन फॉर्म :
तुम्हाला एका एप्लीकेशन फॉर्म अगदी व्यवस्थित पद्धतीने भरून द्यावा लागेल. कारण की क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमची संपूर्ण माहिती व्यवस्थित असणे अत्यंत गरजेचे आहे.

लेटेस्ट सॅलरी स्लीप :
समजा तुम्हाला प्रत्येक महिन्याला पगार मिळत असेल. म्हणजेच तुम्ही एखाद्या ठिकाणी दरमहा बेसवर सॅलरी घेत असाल तर, तुम्हाला सर्व सॅलरी स्लिप एकत्र करून ठेवायच्या आहेत. या सॅलरी स्लिपचं अनुदान करून तुम्ही पेमेंटसाठी सक्षम आहात की नाही या सर्व गोष्टी पाहिल्या जातात.

बँक स्टेटमेंट :
तुम्हाला बँक स्टेटमेंट देण्यात अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला बँकेकडून मागील तीन ते सहा महिन्यांमधील स्टेटमेंट आवश्यक आहे. यामुळे तुमची स्थिरता तपासली जाते. सॅलरीड व्यक्तींसाठी 16 नंबरचा फॉर्म वेतन आणि पेमेंटसाठी केलेल्या दंड आणि दंड कपतीचे प्रमाण असते.

पासपोर्ट साईज फोटो :
क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला पासपोर्ट साईजच्या फोटोची गरज भासणार आहे. यासाठी जुने नाही तर नुकतेच काढलेले पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला द्यावे लागतील.

महत्त्वाचं :
क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करताना तुमचा सिबिल स्कोर जरूर चेक करा. सिबिल स्कोर हा तीन अंकी नंबर असतो. जर तुमचा सिबिल स्कोर तीनशेच्या खाली असेल किंवा 300 पर्यंत असेल तर, तुम्ही क्रेडिट कार्डसाठी भरलेला फॉर्म आपोआप रिजेक्ट होईल. त्याचबरोबर तुमचा सिबिल स्कोर 750 ते 900 पर्यंत असेल तर तुम्हाला लगेचच चांगले क्रेडिट कार्ड देण्यात येईल. त्यामुळे सिबिल स्कोर चेक करा. तुम्ही तुमचा सिबिल स्कोर ऑनलाइन पद्धतीने देखील चेक करू शकता.

Latest Marathi News | Credit Card Required Documents 23 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Credit Card(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x