14 May 2024 11:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Salary Account Benefits | हलक्यात नका घेऊ भाऊ, नोकरी संबंधित सॅलरी अकाउंटचे बरेच फायदे आहेत, माहिती आहेत?

Salary Account Benefits

Salary Account Benefits | आपल्या रोजच्या गर्जा आणि सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वच व्यक्ती पैसे कमावत असतात. आत काहीजण व्यवसायाचा पर्याय निवडतात तर काही नोकरी निवडतात. तर तुम्ही देखील नोकरी करत असाल तर ही बातमी संपूर्ण वाचा. यातुन तुम्हाला खुप फायदा होइल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर बॅंकेत तुमचे खाते नक्की असणार.

अशात दर महिन्याला येणारा पगार योग्य बॅंक खात्यत घेतल्यास त्याचा मोठा फायदा होतो. अनेक ठिकाणी कामातूनच सॅलरी अकाउंट खोलण्यास सांगितले जाते. तुमचे सॅलरी अकाउंट असेल तर त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र तसे नसेल आणि तुम्ही तुमच्या सेविंग अकाउंटमध्येच सॅलरी घेत असाल तर याने तुमचे नुकसान होऊ शकते.

प्रतिपूर्तीचा फायदा
तुम्ही सेविंग अकाउंटमध्ये तुमचा पगार घेत असाल तर तुम्हाला अनेक सुविधांपासून दुर ठेवले जाते. कारण सेविंग अकाउंटमध्ये दर महा तुमचे पैसे यातीलच याची काही शाश्वती नसते. त्यामुळे सॅलरी अकाउंट महत्वाचे आहे. यात तुम्हाला पगाराची प्रतिपूर्ती मिळते.

झिरो बॅलेंन्स
तुमच्या सेविंग अकाउंटमध्ये तुम्हाला ठरावीक शुल्क भरून खाते सुरु करावे लागते. तसेच ते मेनटेन ठेवावे लागते. जर ठरावीक बॅलेंन्स नसेल तर तुमचे खाते बंद केले जाते. मात्र सॅलरी अकाउंट खोलण्यासाठी एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही. तसेच तुमचा आलेला सर्व पगार तुम्ही काढून घेऊ शकता. यात तुम्हाला झिरो बॅलेंन्स ठेवता येतो. त्यासाठी कोणताही दंड आकरला जात नाही.

एटीएम सेवा मोफत
जर तुमचे सॅलरी अकाउंट असेल तर तुम्हाला संपूर्ण किटमध्येच एटीएम कार्ड दिले जाते. तुमचे एटिएम कार्ड तुम्ही कोणत्याही दुस-या बॅंकेच्या एटीएममध्ये मोफत वापरू शकता. यासाठी कोणतेच अतीरिक्त शुल्क आकारण्यात येत नाही. एका महिन्यासाठी तुम्ही कितीही वेळा ते वापरू शकता.

लॉकर चार्जेसचे नो टेन्शन
ब-याच बॅंका सॅलरी अकाउंटसाठी लॉकर चार्जेस लावत नाहीत. मात्र एसबीआय खाते दारकांना सॅलरी अकाउंटवर लॉकर चार्जेससाठी २५ टक्के सुट दिली आहे. यालह सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला कर्जाची सुविधा, डिमॅट खाते, नेट बॅंकींग, डेबिट क्रेडिट कार्ड आशा सर्व सुविधा मिळतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Salary Account Benefits need to know check details on 01 March 2023.

हॅशटॅग्स

Salary Account Benefits(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x