17 May 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

DCX System IPO | हा IPO मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब झाला, तेजीचे संकेत सुद्धा मिळत आहेत, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या

DCX system IPO

DCX System IPO | DCX Systems ही बेंगळुरू स्थित कंपनी केबल्स आणि वायर हार्नेस बनवते. DCX Systems च्या IPO ला आज गुंतवणूकदारांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे. सबस्क्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी या कंपनीचा IPO 8.57 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. BSE वरील उपलब्ध डेटा नुसार या कंपनीच्या IPO ला 12,43,55,016 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. DCX Systems कंपनी IPO द्वारे शेअर बाजारातून 500 कोटी रुपये जमा करण्याची तयारी करत आहे. या IPO मध्ये कंपनी नव्याने 400 कोटी रुपयेचे शेअर्स जरी करणार असून 100 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जाणार आहे.

वेगवेगळ्या श्रेणींमध्ये झालेले सबस्क्रिप्शन :
IPO सबस्क्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवलेले स्टॉक 26.55 पट अधिक सबस्क्राईब झाले आहे. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 11.05 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. याव्यतिरिक्त, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी ठेवलेला राखीव कोटा 1.82 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. या IPO मध्ये शेअर्सची किंमत 197-207 रुपये निश्चित करण्यात आली आहे. DCX Systems ने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक मार्केटला सांगितले की त्यांनी अँकर गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 225 कोटी रुपये जमा केले आहेत. या कंपनीचे प्रमोटर्स एनसीबीजी होल्डिंग्स इंक आणि व्हीएनजी टेक्नॉलॉजी हे ऑफर फॉर सेल अंतर्गत आपले शेअर्स विकणार आहेत.

IPO चा तपशील थोडक्यात :
DCX Systems कंपनीच्या IPO मध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 75 टक्के कोटा राखीव असेल, असे जाहीर करण्यात आले होते. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के कोटा राखीव ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते. DCX Systems IPO मधून मिळालेली काही रक्कम कंपनीचे कर्ज परतफेड करण्यासाठी वापरली जाईल. या निधीतून कंपनीची खेळत्या भांडवलाची गरज काही प्रमाणात भागवली जाईल. याशिवाय, DCX आपली उपकंपनी रॅनियल अॅडव्हान्स सिस्टीम्समधील गुंतवणूक, भांडवली खर्च आणि कॉर्पोरेट खर्च भागवण्यासाठी काही निधी खर्च करेल. या IPO चे शेअर वाटप 7 नोव्हेंबर 2022 होईल. त्याचबरोबर ज्यां लोकांना कंपनीचे शेअर्स मिळणार नाहीत, त्यांना 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत त्यांचे पैसे परत केले जातील. 10 नोव्हेंबर 2022 रोजी यशस्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात सर्व शेअर्स जमा केले जातील. 11 नोव्हेंबर 2022 रोजी DCX Systems कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध केले जातील.

कंपनीची आर्थिक स्थिती :
DCX Systems कंपनीने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 449 कोटी रुपये महसूल कमावला होता. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीने 56.64 टक्के म्हणजेच 1102 कोटी रुपये महसूल कमावला आहे. कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार मार्च 2020 पर्यंत 1941 कोटी रुपये होता. आणि 31 मार्च 2022 पर्यंत ऑर्डर बुकचा आकार वाढून 2369 कोटी रुपये झाला आहे. DCX System कंपनीने आपल्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस, अॅक्सिस कॅपिटल आणि सेफ्रॉन कॅपिटल यांना नियुक्त केले आहे. हा आयपीओ BSE आणि NSE वर लिस्टिंग होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| DCX system IPO has been opened for Investment on stock market on 02 November 2022.

हॅशटॅग्स

DCX System IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x