5 May 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Career Opportunity | मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा गेमिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी पहा, प्रशिक्षण घेऊन महिना लाखोत पगार मिळेल

Career Opportunity

Career Opportunity | तंत्रज्ञानाच्या युगात भारत विशेष प्रगती करत आहे. पूर्वी मुलं शाळेतून घरी आले की, मैदानात, अंगनात विविध खेळ खेळत होते. मात्र आता सर्व काही डिजिटलायजेशन झाले आहे. त्यामुळे मुलं आपल्याच घरात बसून दुस-या मित्रा बरोबर गेम खेळत असतात. फोन, लॅपटॉप, आयपॅड या मार्फत मुलं गेम खेळतात. याला डिजिटल गेमिंग म्हटले जाते. फक्त लहान मुलंच नाही तर तरुण वर्ग आणि अनेक ४० ते ५० वयाच्या व्यक्ती देखील अशा गेममध्ये रमत आहेत. त्यामुळे करिअर आणि पैसे कमवण्याची ही एक संधी आहे. यातुन पैसे कमवू शकता ते कसे हेच या बातमीतून जाणून घेऊ.

यासाठी तुम्हाला एक कोर्स करावा लागेल. त्याचे नाव गेम डिझायनिंग असे आहे. या कोर्सचे सर्टीफीकेट मिळवण्यासाठी तुम्ही १० वी उत्तीर्ण असावे. तसेच पदव्युत्तप आणि पदवी अभ्यासातील कोणत्याही टेक्नीकल क्षेत्रातील पदवी असावी. तरच याचे शिक्षण तुम्हाला घेता येते.

काय आहे याचा अभ्यासक्रम
गेमिंग क्षेत्रात आपले नाव करण्यासाठी तुम्हाला कोणताही गेमिंग कोर्स करावा लागेल. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार विविध कोर्स निवडू शकता. यात त्या त्या कोर्स प्रमाणे त्याचा अभ्यासक्रम असेल. हे कोर्स करण्यासाठी गेम आर्ट, गेम डेव्लपर्स असे विविध कोर्स उपलब्ध आहेत. तसेच डिप्लोमा इन गेम, डिप्लोमा इन गेम आर्ट, डिप्लोमा इन ऍनिमेशन, थ्रिडी गेम कंटेंट क्रियेटर असे पर्याय देखील आहेत.

१२ वी नंतर ग्रॅज्युएनसाठी तुम्ही गेमिंग बॅचलर ऑफ सायन्स, ऍनिमेशन बॅचलर ऑफ आर्टस, गेम डेव्हलपींग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी यात पदवी मिळवू शकता. ऍनिमेशन, गेम डिझाइन आणि डेव्हलपमेंट अशा क्षेत्रात सायन्स मधून देखील प्रवेश आहे. यात तुम्हाला पदवी बरोबरच पदव्यूत्तर शिक्षण देखील मिळते.

हे क्षेत्र करिअरसाठी नवनविन दारे खुली करत आहेत. यात तुम्ही शिक्षण घेतल्यावर गेम डेव्हलपर किंवा डिझायनर म्हणून काम करु शकात. जेव्हा तुम्ही आणि तुमच्या टिमने बनवलेला गेम स्क्रीनवर येतो तेव्हा भरपूर मागणी असते. त्यामुळे यात उत्तम करीअर होऊ शकते. सध्या अशा गेमसाठी मागणी जास्त आहे.

गेम तयार करताना त्यात काही लेवल असतात. त्यामुळे त्याकडे निट लक्ष द्यावे लागते. यात तुम्ही ऍक्शन, स्पोर्ट्स, जेवण, मेकअप असे विविध गेम बनवू शकता. यात तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी आहेत. गेम रायटर, ग्रफिक प्रोग्राम, गेम प्रोड्यूसर साठी तुम्हाला हायर केले जाते. सुरुवातीला यात तुम्ही ३ ते ४ लाखांचे वार्षीक पॅकेज मिळवू शकता. यात पुढे तुमचा अनुभव वाढला की, तुम्ही महिना लाखो रुपये कमवाल.

या कोर्ससाठी चांगले कॉलेज आणि संस्था
* झी इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट्स, बंगळूर
* भारती विद्यापीठ, पुणे
* माया अकॅडेमी ऑफ अॅडव्हान्स्ड सिनेमॅटिक (MAAC), मुंबई
* अॅनिमेशन आणि गेमिंग अकादमी, नोएडा
* आय पिक्सिओ अॅनिमेशन कॉलेज, बंगळूर
* अरेना अॅनिमेशन, नवी दिल्ली
* एनीमास्टर अॅकेडमी- कॉलेज ऑफ एक्सलन्स इन अॅनिमेशन, बंगळूर

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Career Opportunity Making gaming industry check details on 05 November 2022.

हॅशटॅग्स

Career Opportunity(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x